ईगतपुरीच्या 'रेव्ह पार्टी'त सापडल्या मराठी, दाक्षिणात्य अभिनेत्री

जिल्ह्यातील ईगतपुरीमध्ये एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळून लावली. धक्कादायक बाब म्हणजे या रेव्ह पार्टीत मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचा समावेश होता
ईगतपुरीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा
ईगतपुरीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

नाशिक : जिल्ह्यातील Nashik ईगतपुरीमध्ये Igatpuri एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर Rave Party छापा टाकून नाशिक Nashik ग्रामीण पोलिसांनी Police ही हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळून लावली. धक्कादायक बाब म्हणजे या रेव्ह पार्टीत मराठी Marathi आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचा समावेश असून दोन कोरियोग्राफर आणि 'बिग बॉस' फेम स्पर्धकही या रेव्ह पार्टीत सहभागी असल्यानं खळबळ उडाली आहे. Marathi Actresses Found in Rave Party At Nashik

सध्या संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या संकटातून जातो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असतांनाही नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरीमध्ये मात्र हायप्रोफाईल रेव्ह पार्टी सुरु होती. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ती उधळून लावली. ईगतपुरीच्या 'स्काय ताज व्हिला' या बंगल्यामध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त महितीनंतर पोलिसांनी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणी छापा टाकला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला.

हे देखिल पहा-

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्रींसह बिग बॉस फेम अभिनेत्री, दोन कोरियोग्राफर आणि एका परदेशी महिलेसह एकूण २२ जण या ठिकाणी ड्रग्स आणि हुक्का सेवन करतांना बीभत्स अवस्थेत आढळले. त्यामुळे पोलिसांनी २२ जणांना अटक केली असून अटक केलेल्यांमध्ये १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळहून कॅमेरा, ट्रायपॉडसह मादक द्रव्य जप्त केली आहेत. Marathi Actresses Found in Rave Party At Nashik

ईगतपुरीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा
बालेवाडीच्या 5 कोटींच्या सिंथॅटिक ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्या.. (पहा व्हिडिओ)

धक्कादायक बाब म्हणजे ईगतपुरी शहराजवळचं हा सर्व प्रकार सुरू होता. याआधीही अनेकदा मुंबई-नाशिक महामार्गावर ईगतपुरीजवळ रेव्ह पार्टी आणि तत्सम पार्ट्यांचे प्रकार उघडकीस आले आहेत. कधी खासगी रिसॉर्ट तर कधी खासगी बंगल्यांचा वापर अशा पार्ट्यांसाठी केला जातो. विशेष म्हणजे अशा पार्ट्यांमध्ये हायप्रोफाईल मंडळींचा समावेश असल्याचंही वारंवार समोर आले आहे. कालची ही हायप्रोफाईल रेव्ह पार्टी जरी पोलिसांनी उधळली असली, तरी बेमालूमपणे खासगी जागेत होणाऱ्या अशा अवैध पार्ट्या रोखणं आता पोलिसांसाठी नवं आव्हान बनल आहे. दुसरीकडे नैसर्गिक सौंदर्याने नटलेला ईगतपुरीचा निसर्गरम्य परिसर आता अशा हायप्रोफाईल रेव्ह पार्ट्यांचं माहेरघर बनत चाललाय का? असा प्रश्नदेखील उपस्थित होतो आहे.

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com