
Satyajit Tambe: 'शार्क टँक' या शो ची प्रेक्षकांवर अजूनही भूरळ कायम आहे. पहिल्या सीजनला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर या शोचा दुसरा सीजनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्वतःच्या उद्योगाला किंवा व्यवसायाला भांडवल मिळवण्यासाठी किंवा तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे याकरिता अनेक नवखेउद्योजक या शोमध्ये आपले नशीब चमकवण्यासाठी येतात. प्रचंड लोकप्रिय असलेल्या या शोची भूरळ आता कॉँग्रेसच्या सत्यजीत तांबेंनाही पडली आहे.
सत्यजीत तांबेंनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘शार्क टँक’ शोबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. नव्या सीझनमधील परिक्षकांचं पोस्टर सत्यजित तांबे यांनी शेअर केलं आहे.
“ 'शार्क टँक इंडिया' भारताची प्रतिमा बनल्यास काहीच वावगं वाटणार नाही. या शोमुळे अनेकांना आपल्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा मिळत आहे. त्याचबरोबर व्यवसायातील नवीन क्षेत्रांची ओळखही या शोमधून होत आहे. ‘शार्क टँक इंडिया’ चा मी चाहता आहे” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सत्यजीत तांबे हे स्वत: एक उद्योजक आहेत. ते सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. राज्यातील युवा पिढीला आपल्या व्याख्यानातून करिअर, उद्योग आणि व्यवसाय याबाबत मार्गदर्शन करताना दिसतात. सत्यजीत तांबे आपल्या भाषणातील काही मुद्दे अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे भावी उद्योजकांना त्याचा चांगलाच फायदा होतोय.
दरम्यान, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे सध्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे बरेच चर्चेत आले. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.