
Ponniyin Selvan 2 Release On Amazon Prime Video: ऐश्वर्या राय आणि चियान विक्रम मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पोन्नियन सेल्वन २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. मात्र, पहिल्या भागाच्या तुलनेत मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियन सेल्वन २’ चा दुसरा भाग प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी कुठे तरी कमी पडला. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात दिलासादायक कमाई करत प्रेक्षकांचे मन जिंकले. बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपट आता लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण प्रेक्षकांना ओटीटीवर चित्रपट पाहण्यासाठी पैसै मोजावे लागणार आहे.
थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर अखेर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मात्र हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना घसघशीत रक्कम मोजावी लागणार आहे. बॉक्स ऑफिसवर ‘किसी का भाई किसी की जान’ ला मागे टाकत चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. चोल साम्राज्याच्या इतिहासावर आधारित असलेला हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ वर प्रदर्शित होणार आहे.
OTT प्लॅटफॉर्मवर मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत आहे, पण आता अखेर ही संधी मिळाली असून हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ वर पाहता येऊ शकणार आहे. या चित्रपटाचे ओटीटी राईट्स ॲमेझॉन प्राईम व्हिडीओकडे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांना ‘PS 2’ च्या ओटीटी रिलीजसाठी मोठी रक्कम देण्यात आली आहे. PS-1 आधीपासून Amazon Prime वर हिंदीमध्ये उपलब्ध आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना ३९९ रूपये इतके शुल्क आकारायला लागणार आहेत. OTT प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचे स्क्रिनिंग कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
‘पोन्नियिन सेल्वन २’ चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या याच नावाच्या लोकप्रिय साहित्यिक कादंबरीवरून रूपांतरित केलेला पीरियड ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा आणि जयम रवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, जयराम, प्रकाश राज, विक्रम प्रभू, सरथकुमार, पार्थिवन आणि प्रभू हे कलाकार साहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.