पूनम पांडेचे राज कुंद्रावर गंभीर आरोप म्हणाली... माझा मोबाईल नंबर...

राज कुंद्रा प्रकरणात आता प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेने उडी घेतली आहे.
पूनम पांडेचे राज कुंद्रावर गंभीर आरोप म्हणाली... माझा मोबाईल नंबर...
पूनम पांडेचे राज कुंद्रावर गंभीर आरोप म्हणाली... माझा मोबाईल नंबर...Saam Tv

मुंबई - राज कुंद्रा Raj Kundra प्रकरणात आता प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेने Poonam Pandey उडी घेतली आहे. पूनम पांडेने मुंबई उच्च न्यायालयात Mumbai High Court याचिका दाखल केली आहे. दाखल केलेल्या याचिकेत तिने राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीशी संबंधित लोकांवर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. पूनमने राज कुंद्रावर गंभीर आरोप allegations केले आहेत.

ती म्हणाली की, धमकी देत माझ्याकडून जबरदस्तीने कॉन्ट्रॅक्टवर सही करून घेण्यात आली. ज्यामध्ये मला शूट करावं लागेल आणि त्यांना अपेक्षित असलेल्या पद्धतीने पोज देखील द्याव्या लागतील असे त्यांनी म्हटले होते. मी त्यांच्या म्हणण्यानुसार न वागल्यास माझ्या काही खासगी गोष्टी लीक केल्या जातील असे या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिले होते.

हे देखील पहा -

पुढे पूनम पांडेने आणखी एक थक्क करणारा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, मला या करारावर सही करण्याची इच्छा नव्हती. मला हा करार रद्द करायचा होता पण त्या लोकांनी माझा मोबाईल नंबर लीक केला. ज्यात मला कॉल करा आणि मी तुमच्यासाठी माझे कपडे उतरवेन असे म्हटले होते. त्यानंतर मला हजारो कॉल आले आणि ते माझ्याकडे विचित्र मागण्या करायला लागले. मला अश्लील फोटो पाठवण्यास लोकांनी सुरुवात केली असे म्हणत या प्रकरणानंतर पूनमला घर देखील सोडावं लागल्याचं तिने सांगलीत आहे.

पूनम पांडेचे राज कुंद्रावर गंभीर आरोप म्हणाली... माझा मोबाईल नंबर...
सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण

पूनमने राज कुंद्रा प्रकरणात अडकलेल्या अनेक तरूणींना पुढे येऊन आपली बाजू माडण्याची विनंती देखील केली आहे. याआधी पूनमने २०१९ मध्ये राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले होते. तिने राज कुंद्रासह सौरभ कुशवाहाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. बेकायदेशीररित्या तिच्या फोटोंचा आणि व्हिडीओचा वापर करत असल्याचा आरोप पूनमने केला होता.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com