Poonam Pandey: पाॅर्न फिल्म प्रकरणात पूनम पांडेला सर्वाेच्च न्यायालयात मिळाला दिलासा

उच्च न्यायालयात धाव घेतली आणि दावा केला की आपल्याला फसवले गेले आहे.
Poonam Pandey
Poonam PandeySaam Tv

नवी दिल्ली : पॉर्न फिल्म्स रॅकेट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) आज (मंगळवार) अभिनेत्री माॅडेल पूनम पांडेला (poonam pandey) अटकेपासून संरक्षण दिले. न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती बी व्ही नागरथना यांच्या खंडपीठाने पांडेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या अपीलावर महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. (Supreme Court granted protection from arrest to actress Poonam Pandey)

खंडपीठाने "सूचना जारी करा असे सांगत याचिकाकर्त्यावर (पूनम पांडेवर) (poonam pandey) कोणतीही जबरदस्ती कारवाई केली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. या प्रकारातील फिर्यादीत अभिनेत्री शर्लिन चोप्रासह पांडेला आरोपी करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर २०२१ ला उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

Poonam Pandey
Australian Open 2022: राफेल नदालची विजयी सलामी; आजपर्यंत ७० सामने जिकंले

डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्रा (raj kundra) याच्याविरुद्ध अश्लील व्हिडिओ वितरित केल्याच्या आरोपाखाली नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात अटकेपासून संरक्षण दिले होते. कुंद्रा याच्यावर भारतीय दंड संहिता, महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या काही कलमांतर्गत लैंगिक सुस्पष्ट व्हिडिओ वितरित/प्रसारण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटकेच्या भीतीने कुंद्राने प्रथम सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला परंतु तो नाकारण्यात आला हाेता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती आणि आपल्याला फसवले गेले आहे असा दावा केला हाेता.

edited by : siddharth latkar

Poonam Pandey
Teleprompter बंद हाेताच PM माेदी गाेंधळात; काॅंग्रेसचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com