Tarsame Singh Saini : 'नाचेंगे सारी रात' फेम गायक तरसेम सिंह सैनी यांचं निधन

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी सैनी यांची प्राणज्योत मालवली.
Tarsame Singh Saini : 'नाचेंगे सारी रात' फेम गायक तरसेम सिंह सैनी यांचं निधन
Tarsame Singh Saini Saam Tv

मुंबई: नव्वदच्या दशकात तरुणाईला आपल्या जादुई आवाजावर बेधुंद होऊन थिरकायला लावणारे, 'नाचेंगे सारी रात' आणि 'गल्लां गोरियां' यांसारखी अनेक हिट गाणी देणारे प्रसिद्ध गायक तरसेम सिंह सैनी (Tarsame Singh Saini) यांचे ५४ व्या वर्षी निधन झालं. लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'ताज फ्रॉम स्टिरियो नेशन' या नावानंही त्यांना ओळखले जात होते. रिपोर्ट्सनुसार, ते दोन वर्षांपासून आजारी होते. यकृत निकामी झाल्यानं ते कोमामध्ये होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी सैनी यांची प्राणज्योत मालवली.

सैनी यांना ताज नावानंही ओळखलं जायचं. त्यांनी ऐंशीच्या दशकात गायन क्षेत्रात करिअरला सुरुवात केली. ताज यांना १९८९ मधील 'हिट अँड डेक' या अल्बममुळं खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांनी 'प्यार हो गया', 'नाचेंगे सारी रात' आणि 'गल्लां गोरिया' यांसारखी हिट गाणी दिली.

हे देखील पाहा

Tarsame Singh Saini
Raj Thackeray Aurangabad Sabha : राज ठाकरे आज पुण्यातून औरंगाबादला रवाना होणार | SAAM TV

२३ मार्च २०२२ रोजी ताज यांच्या प्रकृतीबाबत स्टीरियो नेशनच्या ऑफिशियल हँडलवरून माहिती दिली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. ताज यांच्या प्रकतीत सुधारणा होत असून, कठीण काळात चाहत्यांनी दिलेला पाठिंबा आणि त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून आभार, असं नमूद करण्यात आलं होतं.

ताज यांनी 'तुम बिन' चित्रपटातील 'दारू विच प्यार', 'कोई मिल गया'मधील 'इट्स मॅजिक' आणि रेस या चित्रपटातील 'मुझपें तो जादू' यांसारखी पॉप्युलर गाणी गायली होती. ही सर्व गाणी सुपरहिट झाली होती. त्यांनी ऐंशीच्या दशकात आपलं गायन क्षेत्रातील कारकिर्द क्रॉस कल्चरल एशियन म्युझिकसोबत सुरू केली होती. एशियन फ्युजन म्युझिकचे निर्माते म्हणूनही त्यांची ओळख आहे. ताज यांच्या निधनानं संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी ताज यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आठवणींना उजाळा दिला. (Tarsame Singh Saini)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.