
Prabhas-Kriti Sanon News: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि सुपरस्टार प्रभास यांनी आदिपुरुष या चित्रपटामध्ये एकत्र काम केला आहे. ही मोठ्या पडद्यावरील जोडी आपल्याला खऱ्या आयुष्यात देखील एकत्र दिसण्याची शक्यता आहे. क्रिती आणि प्रभास यांच्या नात्याचा वरुण धवन याने केला आहे. भेडिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी क्रिती आणि वरून यांनी एका रिअॅलिटी शो हजेरी लावली होती. तेव्हा वरुण धवनने हे वक्तव्य केले.
वरुणने या शो दरम्यान खूप धम्माल केली. वरुणने करण जोहरला विचारले की, माधुरी दीक्षितशिवाय कोणत्या अभिनेत्रीला सुंदर दिसण्याचे हक्क नाही? करणला पर्याय देत काजोल, रानी, आलिया, करीना आणि दीपिका या अभिनेत्रीची वरुणने नाव घेतली. करणने दीपिकाचे नाव घेतले. तसेच करण वरुणाला म्हणाला, 'या लिस्टमध्ये क्रितीचे का नाही घेतलेस?' क्रितीने सुद्धा करणच्या मुद्दा पुढे करत म्हणाली, 'मी पण तुला प्रश्न विचारणार होते.'
तेव्हा वरुण म्हणाला, ' क्रितीचे नाव यादीत नाही कारण तिचे नाव कोणाच्या तरी हृदयात आहे.' त्यावर करण जोहर सुद्धा विनोदी शैलीत विचारतो, 'कोणाच्या हृदयात आहे?' तेव्हा वरुण धवन म्हणतो, 'आहे एक व्यक्ती जी मुंबईत नाही, ती सध्या दीपिका पदुकोणसोबत शूटिंग करत आहे.' वरुण धवनचे हे उत्तर ऐकून क्रिती सेनन हसू लागली आणि करण जोहरला धक्का बसला. हे वक्तव्य करून वरुण धवनने क्रिती आणि प्रभासच्या अफेअरवर शिक्कामोर्तब केले आहे. कारण प्रभास सध्या दीपिका पदुकोणसोबत प्रोजेक्ट 'के' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. क्रिती आणि प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये प्रभास राम आणि कृती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. (Celebrity)
वरुण धवनने तर क्रिती आणि प्रभासच्या नात्याविषयी हिंट दिली आहे. परंतु क्रितीने सुद्धा यादी याची हिंट दिली होती. एका मुलाखतीदरम्यान कृतीने प्रभासशी लग्न करायचे आहे असे म्हटले होते. कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, आणि प्रभास यापैकी तू कोणाशी लग्न करशील? तेव्हा या रॅपिड फायर राउंडमधील प्रश्नाचे उत्तर देताना क्रितीने प्रभासचे नाव घेतले. (Varun Dhawan)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.