Prabhas:'वाढलेले केस, गळ्यात मफलर...'; प्रभासचा विचित्र लूक पाहून चाहते पडले बुचकाळ्यात

नुकताच प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. तो फोटो पाहून त्याची नेटकरी चांगलीच खिल्ली उडवत आहे.
Prabhas Viral Look
Prabhas Viral LookTwitter

Prabhas Viral Photo: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असणारा कलाकार होता. प्रभासने ‘आदिपुरुष’ चित्रपटात रामाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. तो फोटो पाहून त्याची नेटकरी चांगलीच खिल्ली उडवत आहे.

हा व्हायरल होत असलेला फोटो पाहून नेटकऱ्यांनी प्रभासची खिल्ली उडवली असून त्याला प्रश्नही विचारत आहे. व्हायरल होत असलेला फोटोत प्रभाससोबत रजनीकांत आणि शिवा राज देखील दिसत आहे. अद्याप त्याच्याकडून या बद्दल कोणतेही वक्तव्य समोर आलेली नाही.

Prabhas Viral Look
The Kapil Sharma Show मध्ये भुवन बामने सांगितली आडनावाची ‘Untold Story’, शेअर केला शाळेतील रंजक किस्सा

सोशल मीडियावर हा फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्याचे कॅप्शन आहे, ‘प्रभाससोबत काय झाले? फोटोमध्ये तो किती विचित्र दिसत आहे.’ फोटोत प्रभासला पाहून नेटकरी म्हणतात, ‘तो प्रभास असू शकत नाही. हा फोटो नेटकऱ्यांनी पोस्ट केला असून, कोणीतरी फोटो एडिट केल्याचा संशय व्यक्त केला आहे.’ दुसरीकडे, ‘काहींनी प्रभास चंबळ व्हॅलीच्या डाकूसारखा दिसत आहे.’ अशी कमेंट करत त्याची फिरकी घेतली. काहींनी तो असा का दिसतो याचे कारणही सांगितले, ‘धूम्रपान आणि मद्यपान जास्त केल्यामुळे त्याच्यावर हा दुष्परिणाम झाला असावा.’

हा फोटो खोटा असून सध्या सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल होत आहे. खरंतर या फोटोच्या माध्यमातून कोणीतरी प्रँक करण्याचा प्रयत्न करत आहे. तो फोटो मॉर्फ करून पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी खूप दारू प्यायल्याने त्याची ही अवस्था झाली आहे, अशी टिप्पणी केली आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com