रानबाजार : सुपरबोल्ड रुपात दिसणार प्राजक्ता माळी; तेजस्विनी पंडीतचाही किलर लूक

Prajakta Mali's New Web Series 'Raanbaazaar' : 'रानबाजार'मध्ये प्राजक्ताने दिलेल्या बोल्ड सीनबाबत तेजस्विनीने प्राजक्ताचं भरभरून कौतुक केलंय.
रानबाजार : सुपरबोल्ड रुपात दिसणार प्राजक्ता माळी; तेजस्विनी पंडीतचाही किलर लूक
Prajakta mali's bold scene in raanbaazaar web series on planet marathi ott appInstagram/ @planetmarathiott

मुंबई: कॉमेडी शो, नृत्य, लावणीच्या तालावर थिरकरणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड रुपात दिसणार आहे. 'रानबाजार' या मराठी वेब सिरीजमधून (Web Series) प्राजक्ताचं कधीही न पाहिलेलं रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्राजक्तासह (Prajakta Mali) अभिनेत्री तेजस्विनी पंडीतही (Tejaswini Pandit) बोल्ड रुपात दिसणार आहे. याआधी तेजस्विनीने बोल्ड सीन्स दिले आहेत, मात्र यावेळी प्राजक्ता पहिल्यांदाच बोल्ड सीन करतेय. वेबविश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार' या टायटलखाली रानबाजार (RaanBaazaar) या वेब सिरीजचा टीझर (Teaser) लॉन्च करण्यात आला आहे. येत्या १८ मे ला (उद्या) या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज होणार आहे. (Prajakta mali's bold scene in raanbaazaar web series on planet marathi ott app)

हे देखील पाहा -

तेजस्विनीकडून प्राजक्ताचं कौतुक

प्लॅनेट मराठी (Planet Marathi OTT Platform) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सिरीज रिलीज करण्यात येणार आहे. 'रानबाजार'मध्ये प्राजक्ताने दिलेल्या बोल्ड सीनबाबत तेजस्विनीने प्राजक्ताचं भरभरून कौतुक केलंय. तेजस्विनी म्हणाली की, आजवर आपण तिला अनेक भूमिका साकारताना पाहिलं. एक कलाकार म्हणून स्वतःला एका चौकटीत न बांधता आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या संपूर्ण विरोधी भूमिका साकारण्याचा प्रयत्न प्राजक्तानं 'रानबाजार' मध्ये केलाय. प्राजक्ता तुला शुभेच्छा असं तेजस्विनीने इंस्टाग्रामवर लिहीलंय.

प्राजक्ताच्या भावना

आपल्या बोल्ड सीनबाबत प्राजक्ता म्हणाली की, "प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न."

अभिजित पानसे यांनी दिग्दर्शन केलेली ही एक पॉलिटिकल क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे. या वेब सिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली आहे. रानबाझार ही वेब सिरीज २० मे ला प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. सत्य घटनेवर आधारीत असलेली ही वेब सिरीज तिच्या टीझरमुळे रिलीज होण्याआधीच चर्चेत आली आहे.

Prajakta mali's bold scene in raanbaazaar web series on planet marathi ott app
जरा हटके ! नवरीची बैलगाडीतून धमाकेदार एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात है’

नेटकऱ्यांचा प्रतिसाद कसा?

रानबाजार वेब सिरीजचा टीझर लॉन्च झाल्यानंतर चाहत्याकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांना प्राजक्ताला ट्रोल केलं तर काहींनी तिचं कौतुकही केलं आहे. एका यूजरने लिहीलं की, ओटीटी विश्वात ही मराठी वेब सिरीज नक्कीच धुमाकूळ घालेल. तर दुसऱ्या एका यूजरने इस्टाग्रामवर लिहीलं की, आपली मराठी संस्कृती संपत चालली आहे. एकूणच या सिरीजची बोल्डनेस पाहता वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com