
Prasad Oak Announced Dharmveer Part 2: अभिनेता प्रसाद ओक महाराष्ट्राची हस्यजत्रा या मालिकेतून नेहमीच आपल्या भेटीला येत असतो. तसेच चित्रपटामध्ये देखील प्रसाद दमदार भूमिका बजावत असतो. प्रसादने साकारलेल्या धर्मवीर चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. आज या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त प्रसाद ओकने खास पोस्ट केली आहे.
प्रसाद ओकने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रसाद आनंद दिघे यांचा लूक करताना दिसत आहे. प्रसाद ओक मेकअप रूममधील फोटो व्हिडिओ शेअर केला आहे. (Latest Entertainment News)
तसेच पोस्टला कॅप्शन देत म्हटले आहे, "धर्मवीर" 'माझ्या आयुष्यातल्या या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय...!! या भूमिकेनी, या चित्रपटानी मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे.
पुन्हा एकदा प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांत जी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि धर्मवीरच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मनःपूर्वक आभार...!!! आणि रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार...!!!
धर्मवीर - भाग 2 ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळेल अशी आशा करतो...!!! "दिघे साहेब"... असेच कायम पाठीशी रहा'
'धर्मवीर' चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याने प्रसाद ओकने ही पोस्ट केली आहे. तसेच 'धर्मवीर' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघे यांच्यावर आधारित आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. 'धर्मवीर' बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.