HanuMan Teaser: प्रशांत वर्माचा पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

चित्रपट निर्माते प्रशांत वर्मा यांनी सोमवारी त्यांच्या आगामी 'हनुमान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.
Hanuman Movie Teaser Release
Hanuman Movie Teaser Release Saam Tv

HanuMan Teaser Out: चित्रपट निर्माते प्रशांत वर्मा यांनी सोमवारी त्यांच्या आगामी 'हनुमान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. सायन्स-फिक्शन, डिटेक्टिव्ह आणि झोम्बी एपोकॅलिप्स यांसारख्या लोकप्रिय शैलींमध्ये मध्यम-बजेट चित्रपट बनवण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांचा आगामी चित्रपट दिग्दर्शकांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. प्रशांत वर्मा त्यांच्या पुढील चित्रपटामध्ये भारतीय पौराणिक कथांमधील शक्तिशाली पात्रांद्वारे प्रेरित सुपरहिरोबद्दल सिनेमॅटिक विश्व तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

या चित्रपटातील मुख्य पात्र भगवान हनुमानापासून प्रेरित आहे. टीझरमध्ये आपल्याला पौराणिक जगाची झलक पाहायला मिळते. ज्यामध्ये भगवान हनुमानाची शक्ती आहे. टीझरमध्ये ऐकू येणार संस्कृत स्तोत्रे आपल्याला एका रत्नाविषयी सांगत आहेत. ज्यामुळे हनुमानाच्या अमर्याद शक्तींमध्ये प्रवेश होतो. त्यानंतर आपला आजच्या काळाचे दर्शन घडते. जिथे आम्हाला चित्रपटातील हायलाइट करणारे अनेक दृश्ये पाहायला मिळतात. हनुमानाचे पारंपारिक शस्त्र, गदा घेऊन सुसज्ज असलेल्या एका शक्तिशाली प्रतिस्पर्ध्याचा नायक देखील आपल्याला या टीझरमध्ये दिसतो. (Movie)

Hanuman Movie Teaser Release
Sonam Kapoor: सोनम कपूरने दाखवली 'वायू'ची झलक, सोशल मीडियावर व्हिडिओ चर्चेत

“तुम्ही माझे आधीचे चित्रपट पाहिले तर तुम्हाला काही पौराणिक संदर्भ सापडतील. हनुमान या पौराणिक पात्रावर पहिल्यांदाच पूर्ण चित्रपट करत आहोत. अनेकांमधला हा पहिला आहे. आम्ही अनेक पात्रांसह प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करत आहोत. आम्ही आधीच अधीरा नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. मी स्त्रीकेंद्रित सुपरहिरो चित्रपटाचीही योजना आखात आहे. हे सर्व चित्रपट आपल्या पौराणिक कथांपासून प्रेरित असतील. परंतु ते आधुनिक काळात सेट केले जातील. अशा चित्रपटांकडून खूप अपेक्षा असतील. पहिल्यांदाच, मला विश्वास आहे की मी माझ्या टीझर आणि ट्रेलरपेक्षा चांगला चित्रपट बनवला आहे,” असे प्रशांत यांनी सांगितले आहे. “हा केवळ तेलुगु चित्रपट नाही तर आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे, असे दिग्दर्शकांनी म्हटले आहे. हा केवळ भारतातील नाही तर संपूर्ण जगाचा चित्रपट आहे.” (Celebrity)

हनुमानमध्ये तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे. प्रशांत वर्माने सांगितले आहे की तेजाचे "अंडरडॉग म्हणून आकर्षण होते ज्यामुळे त्याला लीडमध्ये कास्ट करण्यास प्रवृत्त केले." या चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथ कुमार, विनय राय, राज दीपक शेट्टी, वेनेला किशोर, गेटअप श्रीनू आणि सत्या यांच्याही भूमिका आहेत. (Actors)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com