
Dhishkyaoon Upcoming Marathi Movie: 'वेड' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटापाठोपाठ 'सरला एक कोटी', व्हिक्टोरिया हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटांमध्ये 'ढिशक्यांव' चित्रपटाचा देखील समावेश होणार आहे. 'ढिशक्यांव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ताच्या या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला आहे.
काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या पोस्टरचे पोस्ट प्रदर्शित झाली होते. त्याआधी परमेश परबने त्याच्या लग्नाच्या वेशातील फोटो पाहून सगळेच चकित झाले होते. त्यानंतर हा चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता हे कळल्यावर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाच्या कथेविषयी अजूनच उत्सुकता निर्माण झाली. नुकताच 'ढिशक्यांव' चित्रपटाचा भव्य संगीत अनावरण सोहळा पार पडला.
प्रथमेश परब, सुरेश विश्वकर्मा, अहेमद देशमुख, मेघा शिंदे या कलाकारांच्या तसेच दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांच्या परफॉर्मन्सने या सोहळ्याची शोभा द्विगुणित केली. निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील निर्मित तर 'फिल्मस्त्र स्टुडिओ' आणि 'झटपट फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'ढिशक्यांव' हा चित्रपट १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
'ढिशक्यांव' चित्रपटामध्ये तीन दमदार गाणी असणार आहेत. 'दादा दमान घ्या', 'पोरी रे पोली', 'गेम केली पलटी' असे या चित्रपटातील गाण्यांचे बोल आहेत. चित्रपटातील गाण्यांना संदेश पवार, प्रितम एस के पाटील, संकी स्वरभ यांनी शब्दबद्ध केले आहे. सन्मित वाघमारे, श्रेयस देशपांडे हे या चित्रपटाचे संगीतकार आहेत. चित्रपटातील गाणी गायक रोहित राऊत, सन्मितह वाघमारे, तेजस जगदाळे यांनी गायली आहेत.
'ढिशक्यांव' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रितम एस के पाटील यांनी केले आहे. महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील हे या चित्रपटाचे निर्मिते आहेत.
'ढिशक्यांव' चित्रपटाच्या गाण्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. त्या १० फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.