दाक्षिणात्या मार्केटसाठी 'प्रेगा न्यूज'च्या  अ‍ॅम्बेसिडरपदी काजल अग्रवाल
दाक्षिणात्या मार्केटसाठी 'प्रेगा न्यूज'च्या अ‍ॅम्बेसिडरपदी काजल अग्रवालTwitter

दाक्षिणात्या मार्केटसाठी 'प्रेगा न्यूज'च्या अ‍ॅम्बेसिडरपदी काजल अग्रवाल

देशातील नंबर १ चे गर्भधारणा किट मॅनकाईंड फार्माचे 'प्रेगा न्यूज'ने काजल आग्रवालला दक्षीण भागासाठी आपला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवडले आहे.

देशातील नंबर १ चे गर्भधारणा किट मॅनकाईंड फार्माचे 'प्रेगा न्यूज'ने काजल आग्रवालला (Kajal Aggrawal) दक्षीण भागासाठी आपला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर (Brand Ambassador) म्हणून निवडले आहे. अभिनेत्रीला आपला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर निवडल्यानंतर कंपनीला देशाच्या मोठ्या जनसमुदाया पर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. काजल ही एक लोकप्रिय, प्रसिद्ध आणि अष्टपैलू अभिनेत्री आहे. तिने तेलगू, तमिळ, कन्नड आणि त्याचबरोबर बॉलिवूडमध्येही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. काजल ही भारतीय चित्रपटसृष्टीची फेमस अभिनेत्री आहे आणि तिचे संपूर्ण भारतभर प्रचंड चाहते आहेत. सीता, मगधीरा, वृंदावनम सारख्या लोकप्रिय प्रादेशिक चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर तिने स्पेशल- 26 आणि सिंघम सारख्या बॉलिवूड चित्रपटांसह काम केले आहे, जे प्रेक्षकांमध्ये सुपरहिट ठरले होते.

दाक्षिणात्या मार्केटसाठी 'प्रेगा न्यूज'च्या  अ‍ॅम्बेसिडरपदी काजल अग्रवाल
OMG 2 च्या सेटवर कोरोनाचा शिरकाव; पंकज त्रिपाठी, यामी गौतम मात्र निगेटिव्ह

असोसिएशनचा या मागील हेतू असा आहे की काजल दक्षिण भारतीय बाजारपेठे बरोबरच ती ब्रँडची पोहोच संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. असोसिएशनचा भाग म्हणून, ब्रँड लवकरच 360-डिग्री मोहीम सुरू करणार आहे ज्याचे प्रसारण दूरदर्शन, प्रिंट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केले जाणार आहे.

काजलला बोर्डवर ठेवून, मॅनकाइंड फार्माचे सेल्स अँड मार्केटींग जनरल मॅनेजर जॉय चॅटर्जी म्हणाले, "काजलची आमच्यासोबत उपस्थिती असल्याने आम्हाला आनंद होत आहे. उत्पादनाची जागरूकता निर्माण करण्यासाठी तिची उपस्थिती दक्षिणेकडील बाजारपेठेत आम्हाला जास्तीत जास्त महिलांशी जोडण्यात मदत करेल. या भागीदारीमागील कारण असे आहे की काजल ही अशी अभिनेत्री आहे जिच्या आयुष्याशी अनेक माता सहजपणे जोडल्या जावू शकतात. म्हणूनच, आम्ही त्याचा लाभ घेऊ इच्छितो आणि गर्भवती माताांपर्यंत पोहोचून त्यांच्या मातृत्व प्रवासात त्यांच्या आनंदाचा एक भाग होऊ शकतो. ”

काजल अग्रवाल म्हणाली, “प्रेगा न्यूजच्या कुटुंबाचा एक भाग असणे खूप आनंददायक आहे. प्रेगा न्यूज काही मिनिटांत गुड न्यूज देते आणि तिही एकदम अचूक. खरंच, मातांसाठी हा एक पसंतीचा पर्याय बनला आहे. ही माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान असोसिएशन आहे आणि मी ब्रँडसोबत अर्थपूर्ण भागीदारीची अपेक्षा करते. ”

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.