
Snehdeep Singh Viral Video: काही महिन्यांपूर्वी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'ब्रम्हास्त्र' (Bramhastra) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची फारशी चर्चा झाली नसली तरी त्यामधील केसरिया गाण्याने सर्वांनाच वेड लावले होते. प्रत्येकाच्या ओठावर या गाण्याचे बोल उमटत होते. आता पुन्हा एकदा हे गाणे सर्वत्र चर्चेत आले आहे.
याचे कारण म्हणजे एका पंजाबी गायकाने हे गाणे चक्क ५ भाषांमध्ये गायले आहे. या तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, आनंद महिंद्रांनीही त्याच्या जादूई आवाजाचे कौतुक करत व्हिडिओ शेअर केला आहे. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, स्नेहदिप सिंग या गायकाने 'केसरिया तेरा इश्क है प्रिया' हे गाणे तब्बल पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये गाण्याचा पराक्रम केला आहे. मल्याळम, तमिळ, तेलगू,कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये आपल्या जादूई आवाजाने हे गाणे गात त्याने नेटकऱ्यांना वेड लावले आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओची सर्वत्र तुफान चर्चा होताना दिसत असून नेटकऱ्यांनी त्याच्या आवाजाचे कौतुक केले आहे.
नेटकऱ्यांसह या व्हायरल व्हिडिओचे खुद्द देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरुन त्यांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'हा अप्रतिम परफॉर्मन्स पाहिला. स्नेहदीप सिंगच्या सुरेल आवाजाशिवाय, एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेची ती उत्तम अभिव्यक्ती आहे. अप्रतिम, अशा शब्दात त्यांनी या स्नेहदिपसिंगचे कौतुक केले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर या तरुण गायकावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या या जादूई आवाजाचे कौतुक करणाऱ्या असंख्य कमेंट्सचा वर्षाव या व्हिडिओवर केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही स्नेहदिप सिंगचे तोंडभरुन कौतुक केले आहे. हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी खुप सुंदर, भारत असाच गर्जत असतो, अशी सुंदर प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिली आहे.. थोडक्यात स्नेहदिपचा हा व्हिडिओ सध्या देशात चर्चेचा विषय ठरला आहे...
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.