'द फॅमिली मॅन फेम अभिनेत्री प्रियामणिचे लग्न बेकायदेशीर ?

प्रियामणिने 2017 मध्ये मुस्तफा राजशी (Mustafa Raj) लग्न केले.
'द फॅमिली मॅन फेम अभिनेत्री प्रियामणिचे लग्न बेकायदेशीर ?
'द फॅमिली मॅन फेम अभिनेत्री प्रियामणिचे लग्न बेकायदेशीर ? saam tv

'द फॅमिली मॅन' (The Family Man) वेब सिरीजची (Web Series) 'सुची' आणि दक्षिण भारतीय चित्रपटांची अभिनेत्री प्रियामणि (Priyamani) यांच्या लग्नामुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे. प्रियामणिने 2017 मध्ये मुस्तफा राजशी (Mustafa Raj) लग्न केले. मात्र या दोघांच्या लग्नानंतर पाच वर्षांनी मुस्तफाची पहिली पत्नी आयशाने या लग्नाला कोर्टात आव्हान दिले आहे. मुस्तफा आणि प्रियामनी यांचे लग्न 'बेकायदेशीर' असल्याचे आयशाचे म्हणणे आहे. कारण मुस्तफाशी आपला कायदेशीर घटस्फोट झाला नसून मुस्तफाने प्रियामणिशी केलेले लग्न बेकायदेशीर असल्याचे तिने सांगितले आहे. ('The Family Man fame actress Priyamani's marriage is illegal?)

'द फॅमिली मॅन फेम अभिनेत्री प्रियामणिचे लग्न बेकायदेशीर ?
'एआर रहमान कोण आहे'? तेलुगू अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

मुस्तफा आणि आयशा यांना दोन मुले आहेत. आयशाने मुस्तफाविरोधात घटस्फोट तसेच घरगुती हिंसाचाराच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणे दंडाधिकारी न्यायालयात आहेत. प्रियामणि दक्षिण भारतीय चित्रपटांची सुपरस्टार आहे. तिचा बॉलीवूडशीही संबंध आहे. ती विद्या बालनची चुलत बहीण आहे. या संपूर्ण प्रकरणावर आयशाने आपले सत मांडले आहे. 'मुस्तफा अद्यापही माझा कायदेशीररित्या माझा पती आहेत. मुस्तफा आणि प्रियामणि यांचे लग्न बेकायदेशीर आहे. जेव्हा त्याने प्रियामणिशी लग्न केले तेव्हा आम्ही घटस्फोटाची नोंददेखील केली नव्हती. आपण बॅचलर असल्याचे त्याने कोर्टाला सांगितले होते.

दुसरीकडे मुस्तफा यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्यावर लावलेले सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. मुलांची काळजी घेण्यासाठी मी नियमितपणे आयशाला पैसे देत आहे. तिला फक्त माझ्याकडून पैसे घ्यायचे आहेत. असे स्पष्टीकरण मुस्तफाने दिले आहे. आयशा आणि तो 2010 पासून विभक्त राहत असून 2013 मध्ये दोघांचे घटस्फोट झाला. माझे आणि प्रियामणिचे 2017 मध्ये लग्न झाले, मग आयशा इतके दिवस गप्प का होती?' असा सवाल केला आहे. यावर आयेशाने आपले शांत राहण्याचे कारण सांगितले आहे. मी दोन मुलांची आई आहे, यासाठी हे प्रकरण मी शांततेत मिटवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु जेव्हा गोष्टी व्यवस्थित होत नाहीत तेव्हा आपण काहीतरी करुन परिस्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मला हे सर्व गमवायचे नव्हते म्हणून मी इतके दिवस शांत होते, असे आयेशाने म्हटले आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com