प्रियांका-निक लग्नाच्या 3 वर्षानंतर झाले आई-बाबा; सरोगसीद्वारे बाळाचा जन्म

देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई झाली आहे. सोशल मीडिया अकाउंटवरून प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Priyanka And Nick
Priyanka And NickSaam Tv

मुंबई - बॅालिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) आई-वडील झाले आहेत. रात्री उशिरा त्यांनी ही चांगली बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रियांका आणि निक लग्नाच्या 3 वर्षानंतर आई-बाबा झाले आहेत.सरोगसीच्या (Surrogacy) माध्यमातून प्रियांका आई झाली. आई झाल्यामुळे प्रियांका खूप आनंदी आहे. प्रियंकाने स्वत:च्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. (Priyanka chopra and Nick jonas welcome baby through surrogacy)

मध्यरात्री प्रियंका चोप्राने दिली गूड न्यूज

'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने रात्री उशिरा सोशल मीडियावर निक जोनासला टॅग करत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, 'आम्हाला हे कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे स्वागत करत आहोत. आम्ही आदरपूर्वक या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगण्याचे आवाहन करतो, कारण आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. सर्वांचे आभार' असं प्रियंका म्हणाली आहे.

प्रियांकाने ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. अथिया शेट्टी, लारा भूपती, पूजा हेगडे, नेहा धुपिया, हुमा कुरेशी, प्रज्ञा कपूर आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या पोस्टवर कमेंट करून तिचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, प्रियांका आणि निक यांचे 2018 साली लग्न झाले. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com