
Priyanka Chopra: बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपले नशीब वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीत चमकवत आहेत. काही अभिनेत्रींनी हॉलिवुडमध्येही आपले नशिबाचे तारे चमकवले. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाने काही हॉलिवुड चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. आता प्रियांका ही ब्रिटिश वोग मासिकावर (British Vogue Magazine) झळकली आहे. प्रियांका ही या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
ब्रिटिश वोगच्या सोशल मीडिया पेजवर प्रियांकाचे काही हटके पोजमधील फोटो शेअर करण्यात आले आहे. फोटोमध्ये प्रियांका क्लासी लूकमध्ये दिसत आहे. पिवळ्या रंगाचा जॅकेट आणि मोकळे केस अशा लूकमध्ये ती दिसत आहे. प्रियांकाच्या लुकने सर्वांचेच लक्ष आपल्या कडे वेधून घेतले आहे. प्रियंका सोबत तिची मुलगी ही फोटो मध्ये दिसत आहे. ब्रिटिश वोगने शेअर केलेल्या एका पोस्टने प्रियंकाच्या लेकीच्या लुकने ही नजर हटत नाही.
प्रियंका गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना रुपेरी पडद्यावर दिसली नाही. येत्या २०२३ मध्ये ती काही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या चित्रपटातून तर 'सिटाडेल' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सायन्स फिक्शनवर आधारित असलेला चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'SMS फॉर डच' वर आधारित हा चित्रपट आहे.
सोबतच या वर्षात प्रियंका बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकणार आहे. फरहान अख्तरच्या चित्रपटात प्रियंका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सोबतच आलिया भट्ट आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.