प्रियांका चोप्राच्या डोळ्यात पाणी का आले? व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी

बॅालिवूडची देसीगर्ल बॅालिवूडसोबत हॅालीवूडमध्येही आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSaam Tv

मुबंई: बॅालिवूडची (Bollywood) देसीगर्ल बॅालिवूडसोबत हॅालीवूडमध्येही आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. प्रियांका सोशल मिडीयावर देखील चांगलीच सक्रिय असते. प्रियांकाने तिच्या हॅाट लुकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकदा प्रियांका तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर चाहत्यासोबत शेअर करते. मात्र यावेळी तिने असे काही शेअर केले आहे. ज्यामुळे तिचे चाहते आंनदी तितकेच भावूक देखील झाले आहेत. अलीकडेच प्रियंकाने पोलंडमधील निराधार मुलांना भेट दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रियांकाने शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांचे नुकसान झाले आहे. रशियापेक्षा (Russia) युक्रेन कमकुवत देश असला तरी युध्दात हार घेत नसल्याचे दिसते आहे. मात्र तेथील नागरिकांना तेथून पळून जाण्यास भाग पाडले जात आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने युक्रेनमधील काही निर्वासितांची भेट घेतली आणि त्यांची अवस्था पाहून प्रियांका भावूक झाली. नुकताच प्रियांकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे पोलंडमध्ये प्रियांकाने युक्रेननियन निर्वासिसह लहान मुलांची भेट घेतली.

Priyanka Chopra
Alia Bhatt : मी ब्रा लपवून का ठेवू?; 'ट्रोल'धाडीवर आलिया भट्टनं ट्रोलर्सवर काढला राग

विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा ही युनिसेफ गुडविलची एंबेसडर आहे. दरम्यान रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेन सोडलेल्या लोकांना भेटण्यासाठी प्रियांका चोप्रा पोलंडला गेली होती. प्रियांकाने युक्रेनमधील निर्वासितासंह लहान मुलाची भेट घेतली या दरम्यानचा व्हिडीओ प्रियांकाने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तिने युक्रेनमधील युध्द अद्याप संपलेल नाही..... हे जगातील सर्वात मोठे मानवी संकट आहे. युध्द आणि हिसांचारामुळे ज्यांचे जीवन उद्धवस्त झाले आहे अशा महिला आणि नुलांना भेटम्यासाठी पोलांडमध्ये गेले होते असे सांगितले आहे.

Priyanka Chopra
कॅाफी विथ करण- ७ च्या नव्या पर्वात दिसणार आमिर खान आणि करिना कपूर, प्रोमो रिलीज

प्रियांका चोप्राने युनिसेफच्या वतीने युक्रेनियन मुलांशी संवाद साधला. महिला आणि लहान मुलांसोबत खेळताना दिसली आहे, तसंच चित्रकला आणि पेंटिंगही केली आहे. प्रियांकाला मुलांनी हाताने बनवलेल्या बाहुल्या रिटर्न गिफ्ट म्हणून भेट दिल्या. प्रियांकाने तेथील महिलांशी संवाद साधला दरम्यान एका महिलेच्या कुटुंबातील व्यथा ऐकून प्रियांका भावूक झाली. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत प्रियांकाने लिहिले की, 'युद्धाच्या अदृश्य जखमा अशा असतात ज्या आपल्याला सहसा बातम्यांमध्ये दिसत नाहीत. युक्रेनमधील दोन तृतीयांश मुले विस्थापित झाली आहेत. ही प्रचंड संख्या युद्धाचे विनाशकारी वास्तव आहे जिथे सीमा ओलांडणारे ९० टक्के लोक महिला आणि मुले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com