Priyanka Chopra Makes Shocking Claim: त्यांनी मला अंतर्वस्त्रे दाखवायला सांगितली ... २१ वर्षांनंतर प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा
Priyanka Chopra Reveals Dehumanizing Moment: प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयाच्या आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःचे नाव कमावले आहे. प्रियांका बी-टाऊनची देसी गर्ल होती, जिने अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम काम केले आहे. कठोर परिश्रमम आणि अभिनय यामुळे ती समीक्षकांच्या कसोटीवरही खरी उतरली. तिच्या याच गुणांमुळे बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडलाही तिने स्वतःची दाखल घेण्यास भाग पाडले.
प्रियंका चोप्राने इथपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष केला आहे. तर एका दिग्दर्शकाने तिच्याकडे विचित्र मागण्या केल्या आहेत. 21 वर्षे या इंडस्ट्रीत घालवल्यानंतर प्रियंका चोप्राने धक्कादायक खुलासा केला आहे. (Latest Entertainment News)
प्रियांका चोप्राचा हा खुलासा धक्कादायक तर आहेच पण बॉलीवूडमधील काही लोकांची घृणास्पद विचारसरणीही सांगणारा आहे. प्रियांका चोप्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 2002 ते 2003 मधील या घटनेचा खुलासा केला आहे. त्यावेळी ती इंडस्ट्रीत नवीन होती आणि तिला एका चित्रपटासाठी अंडरकव्हर एजंटची भूमिका मिळाली होती.
या चित्रपटात अनेक सिडक्टिव दृश्ये आहेत. तरी एका सीनसाठी दिग्दर्शकाने तिला विचित्र ऑफर दिली. दिग्दर्शकाने प्रियंका चोप्राच्या स्टायलिशला सांगितले की, प्रियंका चोप्राचे कपडे नाही तिची अंतर्वस्त्रे दाखवायची आहेत, नाहीतर चित्रपट बघायला कोण येईल?
दिग्दर्शकाची ही घृणास्पद मागणी ऐकून आधी प्रियंका चोप्राला टॅलेंटचा काही उपयोग नाही असे वाटले. पण ती कोणत्याही स्थिती असे काम करायला तयार नव्हती. दोन दिवस काम केल्यानंतर तिने चित्रपट सोडला.
एवढेच नाही तर प्रॉडक्शन हाऊसचे पैसेही परत दिले. त्यावेळी प्रियांका चोप्रा म्हणाली, अशा घाणेरड्या माणसाचा चेहरा पाहून मी रोज काम करू शकत नाही. त्यापेक्षा चित्रपट सोडलेला बरा. प्रियांका चोप्राने झो रिपोर्टला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.