प्रियांका चोप्राचं लॉस एंजेलिसमधील अलिशान घर कसं आहे ? पाहा INSIDE PHOTO

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवमारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या पर्सनल लाईफमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे
Priyanka Chopra
Priyanka Choprasaam tv

Priyanka chopra news : बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवमारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या पर्सनल लाईफमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra) प्रोफेशनल टू पर्सनल लाईफपर्यत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते प्रियांका चोप्रा लग्नानंतर पती निक जोनासोबत लॉस एंजेलिसमध्ये अलिशान घरात (House) राहत आहे. सध्या प्रियांका तिची मुलगी मालती मेरीमुळे तूफान चर्चेत आहे. याचदरम्यान तिच्या घराची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. प्रियांकाचा राजेशाही थाट पाहून चाहते कौतुकांचा वर्षाव करत आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा विषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. प्रियांका अनेकदा तिचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते, जे चाहत्यांना प्रचंड आवडतात. अलीकडेच, डिजिटल कटेंट क्रिएटर सारा शरीफ प्रियांका चोप्राला भेटण्यासाठी तिच्या लॉस एंजेलिस येथील घरी आली होती. दरम्यान त्यांच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सारा शरीफने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रियांका चोप्रासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा टॉप जॅकेट आणि निळ्या डेनिम जिन्समध्ये कूल दिसत आहे. यासह तिने आउटफिटवर मॅंचिग फूटवेअरही घातले होते. ज्यामुळे तिचा हा होमलूक भन्नाट दिसतो आहे. यासह कटेंट क्रिएटर साराने पांढरा टॉप आणि प्रिटेंड पॅन्ट परिधान केली आहे. फोटोमध्ये सारा प्रियांकाच्या लिव्हिंग रूममध्ये दिसत आहे.

फोटोमध्ये देसी गर्लच्या अलिशान घराची झलक पाहायला मिळते आहे. दरम्यान, प्रियांकाच्या घरातील टेबल असो किंवा फ्लॉवर पॉट, सर्वकाही अतिशय सुंदर आणि नीटनेटकेपणे सजवलेले आहे, निक जोनास आणि प्रियांकाची सुंदर कृष्णधवल फोटो फ्रेमही टेबलावर सजलेली दिसते आहे. प्रियांकाच्या घरातील सदस्य जर्मन शेफर्ड श्वान दिसतो आहे. सारा शरीफने हे फोटो शेअर करत अप्रतिम होस्टिंगसाठी प्रियांका चोप्राचे आभार मानले आहेत. प्रियांकाचे चाहते तिच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

प्रियांका चोप्रा हॉलीवूड गायक निक जोनास लग्न झाल्यानंतर लॉस एंजेलिस या अलिशान घरात राहत आहेत. अलीकडेच प्रियांका आणि निक सरोगसीद्वारे मालती मेरी या मुलीचे पालक झाले आहेत. सध्या प्रियांका तिच्या मुलीसोबतचे आंनदी क्षण जगते आहे. याचदरम्यान प्रियांकाचा मुलीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com