आमिर- किरणनंतर प्रियांका-निकचे लग्न मोडणार?

सोमवारी रात्री अचानक प्रियांकाच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन जोनास आडनाव काढून टाकण्यात आले.
आमिर- किरणनंतर प्रियांका-निकचे लग्न मोडणार?
आमिर- किरणनंतर प्रियांका-निकचे लग्न मोडणार?Saam Tv

मुंबई - देशी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) घेतलेल्या एका निर्णयामुळे तिचे चाहते चांगलेच संभ्रमात पडले आहेत. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन तिचे सासरचे आडनाव जोनास हे अचानक वगळले आहे. प्रियंकाने इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन तिचे सासरचे आडनाव वगळले आहे. प्रियांकाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्यात गायक निक जोनासदरम्यानचे संबंध बिघडल्याच्या अफवा उठल्या आहेत. प्रियांकाने मात्र अचानक सासरचे आडनाव का वगळले याबद्दल कोणतीही पोस्ट केलेली नाही. प्रियांका अथवा तिच्या टीमने याबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही. सोमवारी रात्री अचानक प्रियांकाच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन जोनास आडनाव काढून टाकण्यात आले. (Priyanka Nick divorce rumours)

यानंतर सोशल मीडियावर प्रियांका आणि निकमध्ये काहीसतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं. प्रियांका आणि निक वेगळं होण्याचा निर्णय तर घेत नाही आहे ना? प्रियांका आणि निकमध्ये काही वाद तर झाला नाही ना? असे अनेक प्रश्न चाहते विचारत आहे. यावर आता प्रियांकाची आई मधू चोप्रा (Madhu Chopra) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मधू चोप्रा म्हणाल्या की, प्रियांकाच्या घटस्फोटाच्या चर्चा खोट्या आहेत. त्याचप्रमाणे अशा अफवा पसरवू नका अशी विनंती देखील त्यांनी नेटकऱ्यांना केली आहे. दरम्यान, प्रियांका आणि निक जोनासचे २०१८ साली राजस्थानमधील जोधपूर येथील शाही राजवाड्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com