प्रियंका चोप्राने शेअर केला बिकनीतील Throwback फोटो; रणवीर सिंग हसत म्हणाला...

बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेली प्रियांका चोप्रा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप नावाजलेली आहे.
प्रियंका चोप्राने शेअर केला बिकनीतील Throwback फोटो; रणवीर सिंग हसत म्हणाला...
Priyanka Chhopra News, bollywood news in marathiInstagram/@priyankachopra

बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेली प्रियांका चोप्रा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप नावाजलेली आहे. बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अनेकदा तिच्या थ्रोबॅक फोटोंमुळे चर्चेत असते. (Bollywood news in Marathi)

प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच देसी गर्लने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2000 सालचा आहे. प्रियांका चोप्राच्या या फोटोवर चाहत्यांकडून सेलिब्रिटींकडून कमेंट येत आहेत. मात्र या फोटोवर रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) कमेंटची खूप चर्चा होत आहे.

रणवीर सिंगने फोटोवर कमेंट;

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर वर्ष 2000 चा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना देसी गर्ल प्रियांका चोप्राने लिहिले- 'नोव्हेंबर 2000. मी 18 वर्षांची आहे.' प्रियांकाला फोटो टाकताच तिच्या पोस्टवर कमेंट येऊ लागल्या. प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने तिच्या पोस्टवर फायर इमोजी देत कमेंट केली आहे.

परंतु येथे सध्या चर्चा होतेय ते म्हणजे रणवीर सिंग याच्या कमेंटची चर्चा होत आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने प्रियांका चोप्राच्या थ्रोबॅक फोटोवर पंजाबी शैलीत 'ब्रुहहह' (Bruhhh) आणि हसण्याची ईमोजी दिली आहे, असे लिहिले आहे. रणवीरच्या या कमेंटनंतर प्रियांकानेही यावर प्रतिक्रिया दिली. हेड बॅंगिंग इमोजी बनवून तिने 'बडी' लिहिले आहे. रणवीर सिंगच्या या कमेंटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

फरहान अख्तरसोबत प्रियांका चोप्रा;

बॉलिवूडची स्टार प्रियांका चोप्रा फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत अशी माहिती आहे. प्रियांका चोप्राने नुकतेच Amazon Prime च्या सीरीज 'Citadel' चे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा 'द मॅट्रिक्स 4' मध्येही दिसली आहे.

त्यामुळे लवकरच प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. प्रियांका चोप्रा 2019 मध्ये द स्काय इज पिंकमध्ये दिसली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com