
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Promotional Activity: बॉलिवूडचा भाईजान म्हणून सर्वत्र चर्चेत असणाऱ्या सलमान खानचे या वर्षात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातच सलमानच्या गेल्या अनेक दिवसांपासून ‘किसी का भाई किसी की जान’ची जोरदार चर्चा सुरू आहे. आतापर्यंत चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हाच पॅटर्न ‘पठान’ च्या निर्मात्यांनी ही वापरला होता. त्यामुळे ‘किसी का भाई किसी की जान’ चे निर्मातेही ‘पठान’च्या निर्मात्यांसारखे करणार का? असा सवाल सर्वत्र विचारला जात आहे.
‘पठान’चा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाचा १ टीझर आणि २ दमदार हिट गाणी प्रदर्शित करण्यात आले होते. त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. ही गोष्ट चित्रपटाला फारच वेगळ्या वळणावर घेऊन गेले होते, पण इतकं होऊन देखील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. आता हीच शक्कल ‘किसी का भाई की जान’च्या निर्मात्यांनी लढवली आहे.
‘पठान’ च्या निर्मात्यांसारख ‘किसी का भाई किसी की जान’चे ही निर्माते करत असल्याने सध्या त्यांच्या ट्रिकची चर्चा होणे स्वाभाविक आहे. हा ट्रिक ‘किसी का भाई किसी की जान’च्या निर्मात्यांना किती यश मिळवून देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोबतच चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची मनं जिंकली असून दोन्ही गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
सलमानचे यावर्षी दोन चित्रपट प्रदर्शित होणार असून सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या दोन्ही ही लूकला बरीच पसंदी दिली आहे. अनेकदा ‘टायगर ३’ च्या सेटवरील सलमानचे फोटो लीक झाल्यामुळे चाहते त्याच्या आगामी चित्रपटासाठी उत्सुक आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ २१ एप्रिल २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.