
मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील भरघोस कमाई करणारा चित्रपट म्हणजे 'पुष्पा द राईज'. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकवेळी चित्रपटाविषयी नव-नवीन माहिती समोर येत आहे. चित्रपटाच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतासह परदेशातही चित्रपटाची क्रेझ पाहायला अजूनही मिळत आहे. पुढच्या वर्षी 'पुष्पा: द रूल' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचे नाव 'पुष्पा २' चित्रपटात उच्चारले जात आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर दिसणार असल्याचे मानले जात होते. आता निर्मात्यांनी याबाबत मौन सोडले असून आपली प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हापासून पुष्पा 2 मधील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंडना हिने चित्रपटाच्या शूटिंगबद्दल माहिती शेअर केली तेव्हापासून या चित्रपटाच्या चर्चेला उधाण आले आहे.
अलीकडेच असे सांगण्यात येत होते की , मुख्य खलनायक म्हणजेच फहद फासिलच्या जागी अर्जुन कपूर दिसणार आहे. मात्र नंतर हे पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले. यावर बोलताना चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटाच्या शूटिंग संबंधित माहिती शेअर केली. या महिन्याच्या 20 ते 30 तारखेदरम्यान पुष्पा 2 चे शूटिंग सुरू होणार असल्याचे सांगितले. ही बातमी समोर आल्यानंतर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाचे चाहते खूप खूश दिसत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फाजील अभिनीत पुष्पा 2 म्हणजेच 'पुष्पा द रुल' ऑगस्ट 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Edit By: Chetan Bodke
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.