
साऊथ सुपरस्टार (South Superstar) अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' हा भारतीय चित्रपटसृष्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या दोन्ही स्टाररचा 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसंच जागतिक स्तरावर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती.
'पुष्पा: द राइज'च्या यशानंतर त्याचा दुसरा पार्ट म्हणजेच 'पुष्पा 2: द रुल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत. ते आगामी चित्रपटाबाबतची छोटी-मोठी अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशामध्ये रश्मिका मंदानाने चित्रपटाच्या सेटवरून जबरदस्त फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'पुष्पा: द राइज' या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन पुष्पराजच्या भूमिकेत होता. तर रश्मिका मंदाना ही श्रीवल्लीच्या भूमिकेत होती. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये देखील ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोघांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. नुकताच रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2: द रुल'च्या सेटवरून फोटो शेअर केला आहे. जो पाहून या चित्रपटाचा सेट खूपच भव्य आणि मोठा असल्याचे पाहायला मिळत आहे.
रश्मिकाने पुष्पा-2 च्या सेटवरचा फोटो शेअर करत त्यावर #पुष्पा2 असे लिहिले आहे. हा फोटो पाहून असा अंदाज लावला जात आहे की, एका बंगल्यामुळे चित्रपटासाठी भव्य सेट तयार करण्यात आला आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये एक भव्य राजवाडा दिसत आहे. रश्मिकाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटाचा सेट पाहून चाहत्यांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
पुष्पा -2 चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास ५०० कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन एक नाही तर दोन विलनशी शत्रूची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना व्यतिरिक्त फहाद फाजिल आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.