Allu Arjun : 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनचा जबरदस्त लूक आला समोर!

'पुष्पा द राइज' सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आता 'पुष्पा २' मुळे चर्चेत आला आहे.
Allu Arjun
Allu ArjunSaam Tv

मुंबई : 'पुष्पा द राइज' सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun) आता 'पुष्पा २' मुळे चर्चेत आला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी अल्लू अर्जुनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्टने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या पोस्टला पाहून असे वाटते की, अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा द रुल्स'(Pushpa The Rule) या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचा हा लूक असावा. अल्लू अर्जुनने ही पोस्ट शेअर करताना सांगितले की, यावेळी डबल फायर होणार आहे. हातात सिगार, डोळ्यांवर चष्मा, स्टायलिश केस आणि लेदर जॅकेटमधील अल्लू अर्जुनचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Allu Arjun
Aamir Khan: 'लाल सिंह चड्ढा'च्या बॉयकटमुळे आमिर खान झाला दु:खी, म्हणाला 'काही लोकांना वाटतं मला भारत...

'पुष्पा द राइज' मध्ये अल्लू अर्जुन तस्करांचा लीडर कसा बनतो हे दाखवण्यात आले होते. आता तो कसा त्याचा बिजनेस मोठा करतो आणि सगळ्यांवर राज्य करतो हे 'पुष्पा द रुल्स' मध्ये दाखवले जाणार आहे. जबरदस्त अॅक्शन असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनने जेव्हापासून त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे नवीन फोटो शेअर केला आहे, तेव्हापासून त्याच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही नेटकरी 'स्टाईल है बॉस' अशी कमेंट करून त्याची प्रशंसा करत आहेत तर काही चाहते अल्लू अर्जुनला पॅन इंडियाचा स्टार बनण्यास सांगत आहेत.

अल्लू अर्जुनच्या या पोस्ट संदर्भात अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. असे म्हटले जात आहे की, हा फोटो एका अॅड शूट दरम्यान काढला गेला आहे, तर अल्लू अर्जुनचे चाहते 'पुष्पा द रुल्स' मधील त्याची पहिली झलक असल्याचे सांगत आहेत. सध्या अल्लू अर्जुन 'पुष्पा द रुल्स' चे शूटिंग करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगनंतर लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. माहितीनुसार 'पुष्पा द रुल्स' हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com