
Ranveer Singh In Pushpa 2 Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २: द राईज’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर नेहमीच काही ना अपडेट्स समोर येत आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, कालपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सर्वांनाच चित्रपटात कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
चित्रपटात टॉलिवूडच्या सुपरस्टारसमोर बॉलिवूडमधील एक सेलिब्रिटी दिसणार आहे. रियल लाईफमध्ये एकाच फ्रेममध्ये दिसलेले सेलिब्रिटी आता लवकरच रूपेरी पदड्यावर ही एकत्र दिसणार आहेत. दोघांची ही जुगलबंदी पाहणं प्रेक्षकांना मोठी पर्वणी असून, चला तर जाणून घेऊया चित्रपटात कोणता अभिनेता कोणती भूमिका साकारणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगची ‘पुष्पा २: द राईज’ मध्ये एन्ट्री झाली असून तो चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पुष्पा एका पोलिसाला भेटेल, जो रणवीर असेल आणि त्यानंतर चित्रपटात रणवीरच्या एन्ट्रीने कथानकात बरेच काही बदल आल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकात झालेल्या बदलातून बरीच ॲक्शन आणि ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाही.
‘पुष्पा २: द राईज’चा टीझर आणि पोस्टर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित झाले होते. त्या पोस्टर आणि टीझरमुळे चाहत्यांमध्ये ‘पुष्पा २: द राईज’ बद्दल आणखीनच उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुन तसेच रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने जवळपास १०० कोटींची कमाई केली होती. तर, दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करेल याची सर्वांनाच अपेक्षा आहे.
अभिनेता रणवीर सिंहच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याचा ‘सर्कस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच फ्लॉप चित्रपट ठरला. फ्लॉप ठरलेल्या चित्रपटानंतर आता रणवीर सिंह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्टसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा आजच पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे सर्वांनाच चित्रपटाची कमालीची उत्सुकता लागली. आता रणवीर सिंह ‘पुष्पा २’मध्ये सामील झाल्यानंतर त्याची भूमिका काय राहणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.