
Pushpa The Rise: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाला देशातच नाही तर परदेशातही प्रचंड प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली असून आता लवकरच 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट रशियामध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच वेळी, या सर्वांमध्ये रशियातील प्रेक्षकवर्ग 'पुष्पा: द राइज' चित्रपट अजूनही निखळ प्रेम दाखवत आहे. रशियन महिलांच्या एका ग्रुपचा चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रशियामध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रशियन महिला 'सामी सामी' गाण्यावर ठेका धरत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मॉस्कोमधील रेड स्क्वेअरवरील स्टेट हिस्टोरिकल म्युझियमसमोर महिलांनी 'सामी सामी' गाण्यावर ठेका धरला आहे. व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून यूजर्स कमेंट करून सर्वांचे कौतुक करत आहेत.
'पुष्पा: द राइज' 8 डिसेंबरला रशियामध्ये रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट गेल्या वर्षी भारतात प्रदर्शित झाला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रशियामध्ये पोहोचले आहेत. मंगळवारी चित्रपटाच्या टीमने आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर प्रमोशन दरम्यानचे काही खास फोटो शेअर केले आहेत. अल्लू अर्जुनने लिहित पोस्ट केले की, पुष्पा इन रशिया आणि रश्मिका लिहिले की, रशियातील प्रिव्हेट. पुष्पा द राईज. डे 1 मॉस्को.
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा: द राइज' पासून चाहत्यांनी 'पुष्पा: द रुल' या दुसऱ्या भागाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून लवकरच तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'पुष्पा 2' पहिल्या भागापेक्षा भव्य असेल आणि सुकुमार त्यासाठी कुठेच कसर सोडणार नाहीत. अशा परिस्थितीत 'पुष्पा : द रुल'साठी चाहते उत्सुक आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.