Nishi Singh Passed Away: ‘तेनाली रामा’ तील कलाकाराचं झालं निधन; मनाेरंजनसृष्टीवर शाेककळा

वयाच्या ५० वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
Nishi Singh Passed Away
Nishi Singh Passed AwaySaam Tv

मुंबई - छोट्या पडद्यावरील अभिनेत्री (Actress) निशी सिंह (Nishi Singh) यांचे निधन झाले आहे. निशी सिंह यांनी 'हिटलर दीदी’, ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’ आणि ‘तेनाली रामा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. निशी सिंह गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ५० वर्षी त्यांची अखेरचा श्वास घेतला. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निशी सिंह भडाली यांच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. (Nishi Singh Passed Away)

Nishi Singh Passed Away
Falguni Pathak: नवरात्रोत्सवापूर्वीच फाल्गुनी पाठकच्या गरबा-दांडिया कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल

दोन दिवसांपूर्वीच निशी यांनी 16 सप्टेंबरला त्यांचा 50 वां वाढदिवस साजरा केला होता. अभिनेत्री दीर्घकाळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ही खालवत गेली. त्यातच त्यांना घशाचा गंभीर संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवसांनी निशी यांची तब्येत पुन्हा बिघडली होती.

गेल्या आठ वर्षांपासून निशी सिंह मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत. निशी सिंह यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. निशी सिंह यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, आणि दोन मुलं असा परिवार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com