Raghav Chadha Post Engagement Photos: एक सुंदर मुलगी माझ्या जीवनात आली अन्... राघव चड्ढाने परिणीतीसाठी केली खास पोस्ट

Raghav Chadha Share Cute Post: परिणीती आणि राघव सोशल मीडियावर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.
Raghav Chadha Share Cute Post For Parineeti Chopra
Raghav Chadha Share Cute Post For Parineeti ChopraInstagram @parineetichopra

Raghav Chadha-Parineeti Chopra Engagement Photo: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा त्यांच्या साखरपुड्यानंतर चर्चेत आहेत. परिणीती आणि राघव सोशल मीडियावर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत. ज्यावर त्यांचे चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दोन दिवसांपूर्वी परिणिती चोप्राने एंगेजमेंटचे फोटो शेअर केले होते. तसेच तिने राघवला तिचा जीवन साथीदार म्हणून कसे निवडले ते देखील सांगितले.

आता राघवने त्याच्या होणारी पत्नी परिणीतीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. राघवने सांगितले आहे की, परिणीती त्याच्या जीवनात सुख घेऊन आहे.

राघवने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे क्यूट कपल एंगेजमेंटचा आनंद घेताना दिसत आहेत. एकमेकांमध्ये हरवलेले परिणीती-राघव खूपच क्यूट दिसत आहेत. (Latest Entertainment News)

Raghav Chadha Share Cute Post For Parineeti Chopra
The Kerala Story Released In West Bengal: अखेर पश्चिम बंगालमध्ये 'द केरला स्टोरी' प्रदर्शित; कोर्टाच्या निर्णयानंतर निर्मात्यांना दिलासा

फोटो शेअर करत राघवने लिहिले - 'आणि एका अद्भुत दिवशी, एका सुंदर मुलीने माझ्या आयुष्यात प्रवेश केला, तिच्या हसण्याने माझे जीवन विविध रंगानी भरून गेले. तिने प्रेम आणि सहवासाचे वचन दिले.

आमचा साखरपुडा हा आनंदाचा प्रसंग होता यात शंकाच नाही, आनंदाश्रू, गंमतीजंमती, आनंद आणि मजा आणि नृत्याने आमच्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना जवळ आणले. अगदी पंजाबी पद्धतीने.'

राघवने परिणीतीसाठी एक खास पोस्ट शेअर करताच अभिनेत्रीने लगेचच त्यावर प्रतिक्रिया दिली. परिणीतीला राघवची पोस्ट आवडली. तर राघवच्या सासूने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. फॅन्सही कमेंट करून राघवचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले - काहीही म्हणा, जोडी छान आहे.

परिणीतीने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने राघवाची निवड कशी केली हे सांगितले आहे. दोघेही ब्रेकफास्टसाठी भेटले होते त्यानंतर तिने राघवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या या निर्णयामुळे जीवनात समाधान मिळाल्याची जाणीव झाली.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राचा 13 मे रोजी कपूरथला, दिल्ली येथे साखरपुडा पार पडला. एंगेजमेंटपूर्वी दोघेही अनेकदा डिनर डेटवर स्पॉट झाले होते. तसेच दोघे आयपीएल बघण्यासाठी देखील एकत्र गेले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com