Raghav Chadha Share Post: 'तुमच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत...' राघव-परिणितीने मानले चाहत्यांचे आभार

Raghav-Parineeti Engagement: राघवने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Raghav- Parineeti Share Special Post
Raghav- Parineeti Share Special PostSaam Tv

Raghav-Parineeti Emotional Post After Engagement: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांचा शनिवारी म्हणजे १३ मे रोजी साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाची गेले अनेक दिवस चर्चा सुरु होती. दरम्यान त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. साखरपुडा झाल्यानंतर परिणीतीने त्यांचे फोटो शेअर केले होते तर आता राघवने पोस्ट शेअर केली आहे.

राघवने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राघवने सगळ्यांचे आभार मानले आहेत. राघवने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'परिणीती आणि मी गेल्या काही आठवड्यांपासून, विशेषत: आमच्या साखरपुड्या दरम्यान आम्हाला मिळालेले प्रेम आणि पॉसिटीव्हिटीने आम्ही भारावून गेलो आहोत. (Latest Entertainment News)

Raghav- Parineeti Share Special Post
Priyanka With Malati Merry: प्रियंका- मालतीने केली अमेरिकेच्या रस्त्यावर पायी सफर; निक जोनासने शेअर केली खास व्हिडीओ

आम्ही दोघांचे जग खूप वेगळे आहे आणि आमच्या दोघांची वेगळे जग देखील आमच्या युनियनमध्ये एकत्र आले हे जाणून आश्चर्य वाटत आहे. आम्ही कधीही कल्पना केली नसती त्यापेक्षा मोठे कुटुंब आम्हाला मिळाले आहे.

आम्ही वाचलेल्या/पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीने आम्ही खूप धन्य झालो आहोत आणि आम्ही तुमचे आभार मानू शकत नाही. तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी उभे आहात हे जाणून आम्ही या प्रवासाला निघालो. मीडियामधील आमच्या मित्रांचे विशेष आभार. दिवसभर तिथे उपस्थित राहिल्याबद्दल आणि आम्हाला आनंद दिल्याबद्दल धन्यवाद. प्रेम, परिणीती आणि राघव'

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी अखेर शनिवारी (१३ मे) रोजी दिल्लीतील कपूरथला हाउस येथे साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून गोड फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे.

दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट सोहळा पार पडला. या सोहळ्यात दोघांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. या सोहळ्याला प्रियंका चोप्रा जोनासचाही उपस्थित होते. प्रियांका चोप्रा जोनास ही परिणीतीची बहीण आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या समारंभाला उपस्थिती लावली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे त्यांच्या पत्नीसोबत समारंभात उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेही या साखरपुड्याला उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी देखील या जोडप्याला आशिर्वाद दिले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com