राज कुंद्राने पोलिसांना दिली होती 25 लाखांची लाच? प्रकरणातील आरोपीचा दावा

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी फरार असलेला आरोपी यश ठाकूर याने दावा केला आहे. पोलिसांच्या अटकेपासून बचाव करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांची लाच राज कुंद्राकडून देण्यात आली होती.
राज कुंद्राने पोलिसांना दिली होती 25 लाखांची लाच? प्रकरणातील आरोपीचा दावा
राज कुंद्राने पोलिसांना दिली होती 25 लाखांची लाच? प्रकरणातील आरोपीचा दावाSaam Tv

पुणे : एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी फरार असलेला आरोपी यश ठाकूर Yash Thakur याने दावा केला आहे, पोलिसांच्या अटकेपासून बचाव करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांची लाच राज कुंद्राकडून Raj Kundra देण्यात आली होती. यावर्षी मार्च महिन्यात त्यांनी महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोला ईमेल पाठवून याबाबत तक्रार केली होती. पुढे याच बद्दल यश ठाकूर याने सांगितले आहे की, त्याच्याकडून सुद्धा पोलिसांनी लाच मागितली होती !

माहितीनुसार, यश ठाकूर याने या प्रकरणी महाराष्ट्र अँन्टी करप्शन ब्युरो ACB यांना ईमेल लिहला आणि तक्रार केली होती. यश ठाकूरने दावा केला, गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यांनी राज कुंद्रा याच्याकडून तब्बल 25 लाख रुपये लाच घेतली आहे. त्यानंतर ACB ने तो ईमेल मुंबई पोलीस आयुक्तांना फॉरवर्ड केला.

सन २०२० मध्ये यश ठाकूर यांच्याविरोधात दाखल झाली होती केस:
गुन्ह्यात गुन्हे शाखेने अश्लीलता प्रकरणात राज कुंद्रा आणि त्याचा आयटी हेड रायन थार्प यांच्यासह 11 जणांना अटक केली आहे. यातील प्रथम अटक फेब्रुवारी महिन्यात मड बेटावरील बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर तेथून 5 जणांना अटक करण्यात आली.

सन २०२० मध्ये यश ठाकूर यांच्याविरूद्ध मध्य प्रदेशातील माधवगंज पोलिस स्टेशनमध्ये कलम 354 (डी), 341, 294 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत.

राज कुंद्राने पोलिसांना दिली होती 25 लाखांची लाच? प्रकरणातील आरोपीचा दावा
कधी करताय काकांशी लग्न? आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर फातिमा होतेय 'ट्रोल'

तक्रारदार यश ठाकूर हा अमेरिकेतील एका फर्मचा मालक असल्याचे सांगितले जात आहे. तो फ्लिझ मूव्हीजचा मालक आहे, ज्यांच्या नावावर मॉडेल आणि अभिनेत्री वेब सिरीज आणि शोच्या नावावर कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यासाठी वापरल्या गेल्या होत्या.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com