राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडीSaam Tv

राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

विहान नावाच्या अकाउंट मध्ये मोठ्या प्रमाणत फॉरेन करन्सी

मुंबई - पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणाऱ्या रॅकेट प्रकरणात गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षात सोमवारी रात्री उशिरा उद्योगपती व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रा Raj Kundra याला अटक करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणातमुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. 

दरम्यान या पॉर्न फिल्म्स प्रकरणी राज कुंद्रासह रायन जॉर्न थाँर्प याला देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान राज कुंद्रा याला काही वेळा पूर्वी कोर्टात हजार करण्यात आले होते. पोलिसांनी या दोघांना आता २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील पहा -

राज कुंद्राने या सर्व रँकेटचा व्यवहार करण्यासाठी एच अकाउंट्स या नावाने ५ जणांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला होता. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये  राज कुंद्रा, मेघा विहान अकाऊन्ट, प्रदीप बक्षी, रॉय डिजिटल मार्केटिंग अकाऊन्ट आणि रॉय इवेन्ट कन्टेट हेड या पाच जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

या चॅटमध्ये या व्हिडिओतून कमावलेल्या पैशांचा आकडा देखील समोर आला आहे. त्यात टोटल ऑर्डर १४३३, टोटल कॉइन्स ३ लाख ३२ हजार ४८३,टोटल सेल ४  लाख ४० हजार ३६३ आणि एमटीडीसी सेल २७ लाख ८१ हजार ५५१ असा हिशोब मांडण्यात आला असून कुंद्रा यांचं लोकांशी चॅट केलेला पुरावा पोलिसांच्या हाती लागले आहे.  या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये प्रदीप बक्षी नावाचा एक व्यक्ती दिसून येत आहे हा व्यक्ती दुसरा कोणी नसून राज कुंद्राच्या बहिणीचा नवरा असल्याची माहिती समोर आली आहे. तर विहान नावाच्या अकाउंट मध्ये मोठ्या प्रमाणत फॉरेन करन्सी आढळून आली आहे. त्याचा तपास आता पोलीस  करत आहे. 

राज कुंद्राला २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
25 लाख युवा वाॅरिअर्स नेमणार; उत्तर महाराष्ट्रातून माेहिम सुरु

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्या व्यवसाय आणि शॉर्ट पॉर्न व्हिडीओ शूट होत असल्याची माहिती प्राँपर्टी सेलच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या बंगल्यांवर छापे टाकले. काही टोळ्या तरुण मुलींना चित्रपटात मोठे काम देतो, असे सांगून अश्लील व्हिडीओमध्ये काम करून घेण्यात येत होते. पोलिसांनी या रॅकेटमधून २ मुलींची सुटका केली आहे. मुलींना नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com