
MNS Raj Thackeray New Election Song: ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन आहे. मनसेचा १७ वा वर्धापन दिन ठाणे येथे पार पडणार आहे. मनसेच्या वर्धापनदिनी पक्षाचे नवे गाणे प्रदर्शित होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यात होणाऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात पक्षाचे नवे गाणे वाजणार आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी त्यांचे चिरंजीव ईशान खोपकर यांनी पक्षाच्या नव्या गाण्याची संकल्पना आणि निर्मिती केली आहे. अंधेरीतील यश राज स्टुडिओमध्ये काल या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत म्हटले आहे, 'यशराज फिल्म स्टुडिओत (Yashraj Film Studio)नेमकं काय शिजतंय?'
मनसे हे नवे गाणे अवधूत गुप्तेने(Avadhoot Gupte) गायले आहे. हितेश मोडक यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले असून मंदार चोळकर यांनी ते गाणे शब्दबद्ध केले आहे. यापूर्वी 2017 च्या महापालिका निवडणुकीत अवधूत गुप्तेनी संगीतबद्ध केलेलं 'माझ्या राजाला साथ द्या' हे गाणं खूप गाजलं होतं. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे पक्षाच्या नव्या गाण्यासाह सज्ज आहे.
2007 साली अवधूत गुप्तेने संगीतबद्ध केलेल्या 'शिवसेना गीत' आजही अनेकांच्या ओठावर आहे. अवधूत गुप्तेने अनेक राजकीय पक्षांसाठी
गाणे गायली आहेत. तसेच संगीतबद्ध देखील केली आहेत. अनेक पक्ष्याच्या तसेच सामान्यांच्या कार्यक्रमात आपल्याला ही गाणी ऐकायला मिळतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.