Lata Mangeshkar Death Anniversary: '...लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन', राज ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा

सोशल मीडियावर लाला दीदींचा एक सुंदर फोटो शेअर करत राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहे.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSaam TV

Raj Thackeray Share Emotional Post For Lata Mangeshkar: भारताचा गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. लतादीदी आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. आज त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त अनेक लहान-थोर मंडळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पोस्ट करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांचे ऋणानुबंध सर्वांना माहित आहेत. अनेकदा राज ठाकरे यांना लता दीदींसोबतच्या त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आपण पहिले आहे. सोशल मीडियावर लाला दीदींचा एक सुंदर फोटो शेअर करत राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहे. '...लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.' असे लिहीत राज ठाकरे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

Lata Mangeshkar
Grammy Awards 2023: रिकी केजने तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार

राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की,

दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार.

माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन !

राज ठाकरे

लता मंगेशकर यांनी १९४२ साली त्यांच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनी त्या काळात ९०० पेक्षा अधिक हिंदी गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा अधिक प्रादेशिक भाषांमध्ये लतादीदींनी गाणी गायली आहेत.

आज त्याच्या सृतिदिनानिमित्त सुदर्शन पटनायक यांनी वाळूशिल्प साकारून त्यांना मानवंदना अर्पण केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com