"शेर अकेला ही आता है"; रजनीकांत सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी

24 जुलै रोजी देशात आयकर दिन साजरा करण्यात आला यावेळी नियमितपणे कर भरल्याबद्दल रजनीकांत यांचा सन्मान करण्यात आला.
Rajnikant
Rajnikant Saam Tv

मुंबई - शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत (Rajnikant) हे एक मनोरंजन विश्वातील लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्याप पर्यंत काम केलेले नाही.

रजनीकांत हे एक उत्तम अभिनेते तर आहेच, पण ते टॅक्स भरण्यातही आघाडीवर आहे. रविवारी म्हणजेच 24 जुलै रोजी देशात आयकर दिन साजरा करण्यात आला. यादिवशी साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी नियमितपणे कर भरल्याबद्दल चेन्नईच्या आयकर विभागाने त्यांचा सन्मान करण्यात आला.

हे देखील पाहा -

तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला मनोरंजन इंडस्ट्रीत सर्वाधिक कर भरल्याबद्दल ‘सन्मान पत्र’ देण्यात आले. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याचे काही फोटो शेअर करत याबाबद माहिती दिली आहे. रजनीकांत काही कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांची मुलगी ऐश्वर्याने वडील रजनीकांत यांच्या अनुपस्थितीत तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला.

Rajnikant
टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अक्षय कुमार पुन्हा नंबर वन; आयकर विभागाकडून गौरव

अक्षय कुमार पुन्हा नंबर वन; आयकर विभागाकडून गौरव

अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय कुमारचे दरवर्षी सुमारे 4 ते 5 चित्रपट प्रदर्शित होतात. अक्षय हा उत्तम अभिनेता तर आहेच, पण तो टॅक्स भरण्यातही आघाडीवर आहे. अक्षय कुमार पुन्हा एकदा मनोरंजन उद्योगातील सर्वाधिक कर भरणारा ठरला आहे. रविवारी म्हणजेच 24 जुलै रोजी देशात आयकर दिन साजरा करण्यात आला. यादिवशी आयकर विभागाकडून अक्षय कुमार याचा नियमित कर भरल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com