Thalaivar 171: 'जेलर'च्या यशानंतर रजनीकांत यांचा नवा चित्रपट, 'थलाईवर १७१'ची घोषणा

Rajinikanth Movie: रजनीकांत आणि लोकेश कनगराज त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत.
Rajinikanth Thalaivar 171 Movie Announced
Rajinikanth Thalaivar 171 Movie Announced Saam TV

Rajinikanth Upcoming Movie:

सुपरस्टार रजनीकांत यांच्या जेलर चित्रपट १० ऑगस्ट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने ६०० कोटींचे कलेक्शन केले. भारतासह जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळाली. नुकताच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. जेलर चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना देखील झाला नसेल तोवर रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे.

रजनीकांत यांचा आगामी चित्रपट लोकेश कनगराज यांनी लिहिला आहेत. तसेच तेच हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेने रजनीकांत यांचे चाहते मात्र खूप खुश झाले असणार हे नक्की.

Rajinikanth Thalaivar 171 Movie Announced
Kushal Badrike Post: भर ट्रॅफिकमध्ये रंगलं 'चला हवा येऊ द्या'चं लाईट व्हर्जन; कुशलने भाऊला खुळ्यात काढलं

लोकेश कनगराज सध्या त्यांचा चित्रपट 'लियो'च्या रिलीजसाठी सज्ज आहेत. त्यांच्या या चित्रपटामध्ये साऊथ सुपरस्टार दलपती विजय दिसणार आहे. तर दुसरीकडे रजनीकांत देखील त्यांच्या जेलरच्या यशाचा आनंद घेत आहेत. तर आता रजनीकांत आणि लोकेश कनगराज त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत.

सन पिक्चरने ट्विटरवर (एक्स) पोस्ट करत रजनीकांत आणि लोकेश कनगराज यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कलानिधी मारन सादर करत असलेल्या या चित्रपटाचे तात्पुरते नाव 'थलाईवर 171' असे ठेवले आहे.

कारण रजनीकांत यांचा हा 171 वा चित्रपट आहे. सन पिक्चर्सने केलेल्या घोषणेमध्ये असे लिहिले आहे की, “सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'थलाईवर 171' ची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. या चित्रपटाचे लिखक आणि दिग्दर्शिक आहेत लोकेश कनगराज. (Latest Entertainment News)

लोकेश 2023 मध्ये विजय आणि तृषा कृष्णन अभिनीत 'लिओ', 2022 मध्ये कमल हासन आणि विजय सेतुपती अभिनीत 'विक्रम' आणि कार्ती अभिनीत 'कैथी' सारख्या काही मेगा-यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. 2023 मध्ये आलेल्या 'भोला' या चित्रपटात त्यांनी बॉलिवूड स्टार अजय देवगणसोबत काम केले आहे.

रजनीकांतविषयी बोलायचे झाले तर 10 ऑगस्टला रिलीज झालेला 'जेलर' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिधी मारन निर्मित आणि नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित 'जेलर'मध्ये रजनीकांतसोबत रम्या कृष्णन, योगी बाबू, विनायकन, तमन्ना भाटिया आणि मास्टर ऋत्विक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच मोहनलाल, शिव राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांनी या चित्रपटात कॅमिओ केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com