जान्हवीनं 'या' अभिनेत्याला विकलं तिचं अलिशान घर; किंमत ऐकून सर्वसामान्यांचे डोकेच चक्रावून जाईल

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या कमाईतला मोठा हिस्सा प्रॅापर्टी आणि गुंतवणुकीवर खर्च करत असतात. गेल्या काही दिवसांत अनेक बॅालिवूड स्टार्सने नवी प्रॅापर्टी खरेदी केली.
Janhvi Kapoor Image
Janhvi Kapoor ImageSaam Tv

मुंबई: बॉलिवूड स्टार्स त्यांच्या कमाईतला मोठा हिस्सा प्रॅापर्टी आणि गुंतवणुकीवर खर्च करत असतात. गेल्या काही दिवसांत अनेक बॅालिवूड स्टार्सने नवी प्रॅापर्टी खरेदी केली. आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावने(Rajkumar Rao) देखील आपल्या मालमत्तेत मोठी भर घातली आहे. राजकुमार रावने हल्लीच स्वत:साठी एक आलीशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. विशेष म्हणजे राजकुमारने हे घर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरकडून(Janhvi Kapoor) विकत घेतले आहे.

Janhvi Kapoor Image
VIDEO: भावा जिंकलंस! रणवीर सिंह 'या' एका कृतीमुळं ठरला सर्वांपेक्षा वेगळा

माहितीनुसार, राजकुमार रावने एक आलीशान ट्रिपलेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. राजकुमारने हे अपार्टमेंट ४४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हे अपार्टमेंट मुंबईमध्ये जुहू येथे आहे. विशेष म्हणजे त्याने हे अपार्टमेंट अभिनेत्री जान्हवी कपूरकडून खरेदी केले आहे. राजकुमार आणि जान्हवीने 'रुही' या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. हे घर विकत घेताना राजकुमार खूप खूश आहे. तर जान्हवीने हे घर विकून कोट्यवधींचा नफाही कमावला आहे.

Janhvi Kapoor Image
न्यासा देवगनच्या बॉलिवूड एन्ट्रीवर काजोलची मोठी प्रतिक्रिया, म्हणाली...

दोन वर्षांपूर्वी जान्हवी कपूरने स्वतः ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. जान्हवीने डिसेंबर २०२० मध्ये ३९ कोटी रुपयांना हे घर खरेदी केलं होते. या डीलमधून जान्हवीला ५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. हे घर ३४५६ स्क्वेअर फूट इतके आहे. त्याची प्रति स्क्वेअर फूट किंमत १.२७ लाख रुपये आहे.

या अपार्टमेंटची इमारत बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि बिल्डर आनंद पंडित यांनी बांधली आहे. या इमारतीचे लोटस आर्या असे नाव आहे. माहितीनुसार, राजकुमार राव आणि त्याची पत्नी अभिनेत्री पत्रलेखा या दोघांनी मिळून हा अपार्टमेंट खरेदी केला आहे. राजकुमार रावचा हा नवीन अपार्टमेंट १४व्या, १५व्या आणि १६व्या मजल्यापर्यंत मोठा आहे. या इमारतीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील राहतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com