Gandhi Godse Ek Yudh Movie: तगडी कास्ट, दमदार विषय तरीही 'गांधी गोडसे एक युद्ध' अपयशी का ठरला?

चित्रपटाची कथा आणि स्क्रीनप्ले राजकुमार संतोषी यांच्या विचारला मोठ्या पडद्यावर न्याय देण्यात अयशस्वी ठरली.
Gandhi Godse Ek Yudh movie review
Gandhi Godse Ek Yudh movie reviewInstagram @chinmay_d_mandlekar

Gandhi Godse Ek Yudh Movie Review: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी नऊ वर्षांनी पुन्हा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले आहेत. 'गांधी गोडसे एक युद्ध' हा चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. हा चित्रपट २६ जानेवारीला म्हणजे काल प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये राज कुमार संतोषी वापरलेला जॉनर परदेशी चित्रपटांमध्ये वापरला जातो पण भारतीय प्रेक्षकांसाठी नवीन आहे. कदाचित याचाच चित्रपटाच्या कलेक्शन देखील परिणाम झाला.

'गांधी गोडसे एक युद्ध' या चित्रपटातील पात्र खरी आहेत. पण या चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. भारतीयांसाठी या विषय नवीन आहे. एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटामध्ये देखील दोन कधीही न भेटलेल्या स्वतंत्र सैनिकांची कथा दाखविण्यात आली आहे. परंतु राजामौली यांचा हा चित्रपट संतोषी यांची चित्रपटापेक्षा खूप जास्त चालला.

राजकुमार संतोषी यांनी फक्त दोन वेगवेगळे विचार असलेली ऐतिहासिक पात्रे पडद्यावर आणली. परंतु त्यातही एक पात्र दुसऱ्या पात्राच्या हत्येसाठी जबाबदार देखील आहे. या काल्पनिक चित्रपटामध्ये असे दाखविण्यात आले आहे की जर गोडसे, गांधींना आधी भेटले असते त्यांनी खून केला नसता. या विचारासाठी राजकुमार संतोषी यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. परंतु चित्रपटाची कथा आणि स्क्रीनप्ले राजकुमार संतोषी यांच्या या विचारला मोठ्या पडद्यावर न्याय देऊ शकले नाहीत. एका दमदार विषयावर हा एक कमकुवत चित्रपट ठरला.

Gandhi Godse Ek Yudh movie review
Padma Awards 2023: मनोरंजन आणि कला क्षेत्रातील 'या' दिग्गजांना जाहीर झाला पद्म पुरस्कार

चित्रपटाची कथा असगर वजाहत याच्या नाटकावर आधारित आहे. चित्रपटाशी संबंधित लोकांनुसार चित्रपट बनवताना गांधी आणि गोडसे यांची लिहिल्या पत्रांची देखील मदत घेण्यात आली आहे. चित्रपटाला काल्पनिक वेळेत स्थापित करण्यात आले आहे. गांधी, नाथिराम गोडसे यांच्या हल्ल्यापासून वाचतात आणि नंतर दोघे भेटतात. दोघेही त्यांच्या जीवनातील भिन्न विचारांवर चर्चा करतात. दोघांचे विचार किती बदलतात, हा वैचारिक प्रवास या चित्रपटामध्ये दाखविण्यात आला आहे.

चित्रपटाचा कालावधी छोटा आहे. परंतु मूळ कथा मध्यंतरानंतर सुरू होते. गांधी आणि त्यांच्या विचारांना विरोध करणारे लोक आणि वातावरण यावर चित्रपटाचा सर्वाधिक फोकस आहे. गांधींच्या जीवनातील जाही वादांवर चित्रपटामध्ये भाष्य केले आहे, परंतु त्याचा काही प्रभाव पडलेला दिसत नाही.

गांधी स्त्री-पुरुषांच्या प्रेमाला विकार का मानतात. चित्रपटाच्या शेवटी खूप सुंदर संदेश दिला आहे. जो सध्याच्या परिस्थितीला साजेसा आहे. चित्रपटावर आरोप करण्यात आले आहेत की, चित्रपटामध्ये गांधी यांचे विचार नाकारून नारथुराम गोडसे यांच्या विचारांचे गोडवे गायले आहेत. परंतु चित्रपटामध्ये असे काहीच नाही ज्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातील. चित्रपटाच्या संवादावर कामी करण्याची गरज होती.

चित्रपटातील कलाकारांविषयी बोलायचे झाले तर दीपक अंतानी यांनी १०० हून अधिक नाटकांमध्ये गांधींची भूमिका साकारली आहे. यावेळी त्यांनी गांधींचे पात्र आपल्या लूक, देहबोली आणि संवाद कौशल्यच्या माध्यमातून पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी ते कौतुकाचे पात्र आहेत. चिन्मय मांडलेकरने देखील नथुराम गोडसेंच्या माध्यमातून आपली छाप सोडली आहे.

तनिषा संतोषीने या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले आहे. तिला स्वतःवर अजून खूप काम करण्याची गरज आहे. पूर्ण चित्रपटामध्ये तिचे पात्र फक्त रडताना दिसले आहे. तिचे पात्र आणि चित्रपटातील प्रेमकथा अपूर्ण वाटते. अनुज सैनीसह इतर कलाकारांना करण्यातही काही खास नाहीये.

चित्रपटातील तंत्रज्ञानाविषयी बोलायचे झाले तर, त्यात कोणतीच उणीव नव्हती. चित्रपटाची कथा १९४८ या सालावर आधारित होती. त्यानुसार चित्रपटाचा सेट, कलाकारांचे कपडे आणि लूक यातील बारकावे लक्षात घेऊन काम केले आहे. चित्रपटाची सिनेमेटोग्राफी उत्तम आहे. एआर रहमान यांच्या संगीताने चित्रपटाला योग्य न्याय दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com