Raju Srivastava : 'या' फेमस पात्रामुळं राजू श्रीवास्तव झाले होते प्रचंड लोकप्रिय

प्रेक्षकांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले.
Raju Srivastava Got Popularity From Gajodhar Bhaiya
Raju Srivastava Got Popularity From Gajodhar BhaiyaSaam Tv

Raju Srivastava | नवी दिल्ली: आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं. आपल्या विनोदांनी त्यांनी लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले होते. खूप संघर्ष करून त्यांनी हे यश मिळवलं होतं. राजू श्रीवास्तव यांचं मूळ नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे. २५ सप्टेंबर १९६३ रोजी त्यांचा जन्म कानपूरमध्ये झाला होता. मध्यमवर्गीय कुटुंबात राजू यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील रमेश चंद्र श्रीवास्तव हे कवी होते.

लहानपणापासूनच विनोदवीर व्हायचे होते

राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना लहानपणापासूनच विनोदवीर व्हायचे होते. त्यांचा मिमिक्री सेन्स खूपच उत्तम होता. राजू श्रीवास्तव यांनी १ जुलै १९९३ मध्ये शिखा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. अंतरा आणि आयुष्मान अशी त्यांची नावं आहेत. राजू श्रीवास्तव देशातच नव्हे, तर विदेशातही लोकप्रिय होते.

Raju Srivastava Got Popularity From Gajodhar Bhaiya
Raju Srivastava : हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचं निधन

'गजोधर' पात्रातून मिळाली प्रचंड लोकप्रियता

पाकिस्तान आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यावर विनोद करू नका असं सांगून त्यांना अनेकदा धमक्या मिळाल्या होत्या. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांची अनेक कार्यक्रमांतून मिमिक्री केली. गजोधर भैया बनून त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं. त्यामुळंच ते घराघरांत लोकप्रिय झाले.

Raju Srivastava Got Popularity From Gajodhar Bhaiya
Heart attack : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ट्रेडमिलवर धावताना हृदयविकाराचा झटका, ही परिस्थिती कशी निर्माण होते ? जाणून घ्या

अनेक चित्रपटांत अभिनयाची सोडली छाप

'राजश्री'च्या मैने प्यार किया या चित्रपटात त्यांना छोट्याशा भूमिकेची ऑफर मिळाली होती. त्यापूर्वी त्यांनी बाजीगर आणि इतर चित्रपटांमध्ये (Bollywood Film) भूमिका केल्या होत्या. त्यांनी स्टँड अप कॉमेडियन म्हणून द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये भाग घेतलं होतं. त्यात ते दुसरे रनर अप ठरले होते. त्यांचा यशाचा प्रवास इथेच थांबला नाही. त्यांनी पुन्हा द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज चॅम्पियन्समध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये ते विजेते ठरले होते. त्यानंतर त्यांना द किंग ऑफ कॉमेडी म्हणून गौरवण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com