Raju Srivastava : राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार

उद्या दिल्लीतील निगम बोध घाटावर राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Raju Srivastava
Raju Srivastava SAAM TV

मुंबई : राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) यांच्या निधनाने मनोरंजन जगतासह संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे. या दु:खाच्या प्रसंगी राजूच्या पत्नीला आणि कुटुंबाला खंबीरपणे लढण्याची हिंमत देवो अशी प्रार्थना राजू यांचे चाहते करत आहेत. नुकतेच त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. आता उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. उद्या दिल्लीतील निगम बोध घाटावर त्यांना अंतिम निरोप देण्यात येणार आहे.

Raju Srivastava
Richa Chadha Ali Fazal Wedding : ऋचा-अलीच्या लग्नाचे हटके आमंत्रण, माचीस बॉक्स लग्नपत्रिका व्हायरल

वृत्तांनुसार, राजू श्रीवास्तव या लोकप्रिय विनोदवीराच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, उद्या सकाळी राजू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. (Delhi) दिल्लीतील निगम बोध घाटाच्या व्हीआयपी विभागात राजू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव द्वारका येथून निगम बोध घाटावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा शेवटचा निरोप दिला जाईल.

Raju Srivastava
Chakda Xpress: चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट; म्हणाला अनुष्काचा मला ...

नुकतेच राजू श्रीवास्तव यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. ज्याच्या अहवालात त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात ४२ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या शरीरावर फक्त इंजेक्शनच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. अहवाल आल्यानंतर आता त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम ही केवळ औपचारिकता असल्याचे सांगण्यात आले. उद्याच्या तारखेला त्यांच्या मृत्यूचा मुद्दा कोणी काढू नये म्हणून हे आवश्यक होते. तसंच त्यांचा मृत्यू हे गूढ होतं असं म्हणण्याची संधीही कुणाला मिळू नये म्हणून पोस्टमॉर्टम केल्याचे बोलले जात आहे. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com