
Rakhi Sawant Alleges Ex-Husband Adil Khan: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी, पती आदिल खान दुर्राणीवरून तर कधी तिच्या फॅशनवरून ती चर्चेत असते. सध्या आदिल तुरुंगात तर राखी दुबईत असून तिथून त्याच्यावर सध्या ती आरोप करत आहे. आदिलने मला जीवे मारण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिल्याचा खुलासा राखीने केला आहे. तिने हा खुलासा एका व्हिडीओच्या माध्यमातून केला असून त्यात ती आदिलबद्दलने दिलेल्या सुपारीबद्दल बोलताना दिसत आहे.
आदिल तिला ठार मारण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाल्याने ती शत्रूंपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दुआ पठन करत असल्याची माहिती मिळाली आहे. व्हिडीओमध्ये राखी म्हणते, “मित्रांनो, मी शत्रूपासून दूर राहण्यासाठी प्रार्थना करत आहे. मला आताच कळलंय की आदिलने तुरुंगातून एकाला मला मारण्यासाठी सुपारी दिली आहे. मला आदिलला इतकंच सांगायचं आहे की मी प्रार्थना केली आहे. अल्लाह मी केलेली प्रार्थना स्वीकारेल यावर मला विश्वास आहे. तू मला मारू शकत नाही. तू का माझ्या जीवावर उठलाय? माझ्या प्रॉपर्टीसाठी आणि जीव घेण्यासाठी.” असा सवाल तिने व्हिडीओतून आदिलला केला आहे.
‘ई-टाईम्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार, राखी सावंतने यानंतर एका फोन कॉलचे व्हॉईस रेकॉर्डिंग देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये तिचा एक शुभचिंतक तिला आदिल करत असलेल्या प्लॅनिंगबद्दल अपडेट देत म्हणाला, ‘’नुकतीच मला एक माहिती मिळाली असून जी तुला सांगायची आहे. पण हे सांगताना मी माझी ओळख लपवत आहे. मुख्य म्हणजे मी तुझा शुभचिंतक आहे. आदिलच्या खोलीत काही लोक आहेत, त्यांनी तुला जीवे मारण्यासाठी सुपारी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्लॅनिंग सुरू आहे. तो इथल्या सर्व पोलिसांनाही विकत घ्यायला तयार झाला आहे. ” अशी माहिती तिच्या शुभचिंतकाने राखीला दिली आहे.
यानंतर राखी म्हणते, “मी जेव्हा रमजानच्या महिन्यात रोझा ठेवला होता, तेव्हाच मी त्याला माफ केले होतं. त्याने माझ्या आईची हत्या केली, माझी फसवणूक केली आणि माझे पैसे पण घेतले पण तरीही मी त्याला माफ केले. तरीसुद्धा मी त्याला माफ केलंय. आता माझ्या सर्व गोष्टी अल्लाहकडेच दिल्या आहेत. तो खरंच मला मारण्याचा प्रयत्न करतोय का?
राखीने तिच्या आईचे निधन झाल्यानंतर आदिलवर फसवणुकीचा, मारहाण केल्याचा सोबतच पैसे बळकावल्याचा आरोप केला होता. तिच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलविरोधात एफआयआर दाखल केली होती. सध्या तो तुरूंगात त्याची शिक्षा भोगत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.