Rakhi Sawant: सलमान खान प्रेमाची कबुली उघडपणे देत नव्हता, राखी सावंतनं केली अशी पोलखोल

राखी सावंत बॉलिवूडचा दबंग सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरसोबत दिसत आहे.
Rakhi Sawant and Iulia Vantur
Rakhi Sawant and Iulia VanturSaam Tv

राखी सावंत 25 नोव्हेंबरला म्हणजे आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. राखी सावंत तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न आहे. राखीने इंस्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या सुपरहिट 'परदेसिया' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

राखी सावंतने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती कोणासोबत तरी डान्स करतेय आणि ते जास्त इंटरेस्टिंग आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत बॉलिवूडचा दबंग सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरसोबत दिसत आहे.

Rakhi Sawant and Iulia Vantur
Poonam Dubey: चलो, थोडी आग लगाए...पूनमच्या बोल्डनेसनं ओलांडल्या सर्वच मर्यादा, VIDEO पाहून अंगाची होणार काहिली...

राखीने युलियाला तिच्या सीटवरून उठवले आणि तिचा हात धरून राखी नाचू लागली. यूलिया देखील राखीच्या आनंदात सामील झाल्याचे दिसत आहे. यूलियाच्या किलर डान्स मूव्ह्सचे सर्वजण कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना राखीने कॅप्शनमध्ये युलियाला स्वीटहार्ट भाभी असे म्हटले आहे. (Video)

राखी सावंतने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सलमान खानला सुद्धा टॅग केले आहे. राखी तिचा बर्थडे आऊटफिटमध्ये स्टनिंग दिसत आहे. तिने तिच्या बर्थडेला लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच यूलिया वंतूर सुद्धा शिमरी ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये राखीचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी सुद्धा दिसत आहे. (Celebrity)

राखीने शेअर केलेला हा व्हिडिओ एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. तिने सर्वांसमोर यूलियाला 'भाभी' म्हटले आहे. ज्या नात्याचा सलमानने अजून स्वीकार केलेला नाही. जे नाते आजतागायत सलमानने स्वीकारले नाही, तेच नाते प्रसिद्धीच्या झोतात आणून चर्चेत राहण्याचे काम फक्त राखीच करू शकते. राखीच्या या कृत्यामुळे दबंग सलमान खानला राग येणार नाही, अशी अपेक्षा करूया. कारण सलमानला फक्त राखीचा विनोदी स्वभाव माहीत आहे.

राखी सावंतच्या या व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'आधी भाईजानला विचारा की तिला वहिनी बनवणार आहे की कोणीतरी नवीन वाहिनी आमच्यासमोर येणार आहे.' तर युजरने लिहिले आहे की, राखीने भाभी सांगून स्पष्ट केले आहे की सलमान खान सिंगल नाही. राखीला ट्रोल करत एका युजरने म्हटले आहे की, 'राखी जे सगळं फक्त सलमान खानचे लक्ष वेधण्यासाठी करत आहे'. राखीने सलमानची पोलखोल केल्याचे एका युजरने म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com