राखी सावंतच्या आयुष्यात नवा ड्रामा; पहिल्या नवऱ्यावर केले गंभीर आरोप

अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. शनिवारी राखी सावंत ही पोलीस स्टेशनच्या बाहेर दिसली होती. त्यामुळे राखीच्या आयुष्यात आता काय झाले असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.
राखी सावंतच्या आयुष्यात नवा ड्रामा; पहिल्या नवऱ्यावर केले गंभीर आरोप
Rakhi Sawant Saam Tv

मुंबई : अभिनेत्री (Actress) राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते.शनिवारी राखी सावंत ही पोलीस स्टेशनच्या बाहेर दिसली होती. त्यामुळे राखीच्या आयुष्यात आता काय झाले असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. आता राखी सावंतने (Rakhi Sawant) तिचा पहिला नवरा रितेश याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच राखी सावंतने तक्रार नोंदवल्यानंतर राखीचा पहिला नवरा रितेशनेही सोशल मीडियावर (Social Media) व्हिडीओ पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राखी तिच्या आयुष्यातील नव्या ड्रामाने (Drama) ती पुन्हा चर्चेत आली आहे. (Actress Rakhi Sawant News In Marathi )

Rakhi Sawant
Squid Game Season 2 : नेटफ्लिक्सवर होणार स्क्विड गेम २ लवकरच प्रदर्शित

राखीचा नवरा आरोप करताना म्हणाला,'राखी सावंत फक्त पैशांसाठी लग्न करते.तिच्याकडे सुरुवातीला एकही गाडी नव्हती, तिला मी गाडी दिली होती'. या आरोपावर राखी सावंतने पहिल्या नवऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे. यावर राखी सावंत म्हणाली, 'हे खरं आहे की माझ्याकडे कोणतीच गाडी नव्हती. त्याने मला तेव्हा गाडी दिली होती. परंतु मी त्याला त्याची गाडी पुन्हा केली. कारण त्याने मला ती गाडी परत करण्यासाठी सांगितलं होतं. आता माझ्याकडे आदिलने भेट दिलेली एक गाडी आहे'.

Rakhi Sawant
Siddhanth kapoor : श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला अटक; ड्रग्ज घेतल्याचा आरोप

राखी सावंत पुढे म्हणाली, 'रितेश हे सगळं खोटं सांगत आहे. त्याने मला जे दागिने दिले होते ते सगळे खोटे होते. जेव्हा मला आईच्या उपचारासाठी पैसे हवे होते. तेव्हा मी ते दागिने घेऊन सोनाराकडे गेली. तेव्हा मला कळलं की हे दागिने कोणते आहेत. तेव्हा मला खूप हसू आलं. मला सांगितलं होतं की, हे सगळे दागिने खरे आहेत. खरंतर चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा लावलेले दागिने होते.

राखी सावंतने पुढे सांगितलं की, तिने खोट्या दागिन्यांबद्दल रितेशसोबत बोलायला गेली होती. 'मी त्याला विचारलं, तुला लाज नाही वाटत मला खोटे दागिने द्यायला?' तेव्हा पहिला नवरा म्हणाला 'तू याच लायकीची आहेस'. तसेच त्याने मला धक्के मारून घराबाहेर काढले . तसेच मला अशिक्षित म्हणाल्याचे राखीने सांगितले. दरम्यान, राखी सावंतचे पहिल्या नवऱ्याबरोबर शाब्दिक वाद सुरूच आहे. त्यामुळे राखी सांवतने केलेल्या आरोपावर पहिला नवरा रितेश काय उत्तर देणार , याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com