
Rakhi Sawant Trolled: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयामुळे चर्चेत असते. राखी सावंत लग्नानंतर पहिल्यांदाच रमजानच्या महिन्यात रोझा करत आहे. सोबतच ती दररोज नमाजही अदा करते. दरम्यान माध्यमांसमोर येत तिने, मेकअप करत नाही, दोन दिवसातच रोझा करत असल्यामुळे चेहेऱ्यावर तेज आलं असल्याचं राखीचं मत आहे. सध्या तिचा हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
सध्या राखीचा रमजानच्या महिन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे, या व्हायरल व्हिडीओत सध्या रोझाच्या दिवसात काय करते ? या बद्दल सांगितले. याशिवाय तिने आदिल खान दुर्रानीचाही व्हिडीओ उल्लेख केला आहे. यावेळी राखी म्हणते, “रोझाच्या दिवसांमध्ये मेकअप करत नसल्यामुळे मी सुद्धा मेकअप करत नाही. म्हणूनच माझी मैत्रिण मला म्हणते, तू मेकअपशिवाय खूप सुंदर दिसतेस. एवढी चमक अवघ्या दोन दिवसांत आली आहे. आता बघा मी ३० दिवसात किती सुंदर दिसते.”
सोबतच राखी नमाज अदा करण्याशिवाय म्हणते, “मी सकाळी फजर नमाज, जोहर नमाज, असर नमाज, मगरीब नमाज, ईशा नमाज हे सर्व वाचते. यासोबतच मी तराबीमध्ये 20 रकातही वाचते. जर तुम्ही पण त्याचे पठण केले तर, तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. हे मी ऐकलं आहे. म्हणून मी त्याचे पठन करते, कारण, आदिलने माझ्याकडून घेतलेले पैसे परत देईल.”
राखी म्हणते, रकत वाचण्यासाठी संपूर्ण रात्र लागते. 20 खूप जास्त आहे. माझ्यासाठी हे सर्व नवीन आहे. सध्या मी इस्लाममध्ये एक लहान मुलगी आहे. आता मी हळू हळू सर्व शिकते. पण मी पाच वेळा नमाज अदा करते. ही व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
नेटकरी म्हणतात, ‘मेकअप नाही केला म्हणते? चेहरा किती चमकतोय तुझा’, ‘तराबीच्या नमाजसाठी संपूर्ण एक रात्र जात नाही, काहीही खोटं बोलू नकोस’, ‘राखी थोडा वेळ काढून भगवतगीता आणि रामायण वाचले तर १० वेळा कुराण वाचण्याची गरज पडणार नाही.’ असं म्हणत तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.