Drugs Case: रकुल प्रीत ईडीच्या कार्यालयात

अभिनेते रकुल प्रीत सिंग शुक्रवारी अंमली पदार्थाच्या प्रकरणात Drugs Case अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचली आहे.
Drugs Case: रकुल प्रीत ईडीच्या कार्यालयात
Drugs Case: रकुल प्रीत ईडीच्या कार्यालयातSaam Tv

हैदराबाद: अभिनेते रकुल प्रीत सिंग Rakul Preet Sings शुक्रवारी अंमली पदार्थाच्या प्रकरणात Drugs Case अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचली आहे. चार वर्षापूर्वीच्या म्हणजेच 2017 मधील ड्रग्स प्रकरणात टॉलीवूड सेलिब्रिटींना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने रकुल प्रीत सिंग, राणा दग्गुबती, रवी तेजा, चार्मी कौर, नवदीप, मुमैथ खान आणि दिग्दर्शक पुरी यांच्यासह 12 अभिनेते आणि दिग्दर्शकांना बोलावले होते. हे प्रकरण 2017 मध्ये ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्याशी संबंधित आहे.

ईडीने टॉलिवूड सेलिब्रिटींना 31 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर दरम्यान हजर राहण्यास सांगितले होते. त्यामध्ये रकुल प्रीतला सप्टेंबरपूर्वी 6 सप्टेंबरला तपासात सामील होण्यासाठी सांगण्यात आले होते. तर दुसरीकडे, राणा दग्गुबतीला 8 सप्टेंबर रोजी बोलावले आहे.

तेलंगणा एसआयटीने एका दक्षिण आफ्रिकन नागरिकाला ऑगस्ट 2017 मध्ये मुंबईहून हैदराबादला कोकेन पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

Drugs Case: रकुल प्रीत ईडीच्या कार्यालयात
'आया है राजा लोगो रे लोगो..' हातात तलवार घेऊन व्हिडीओ बनवणे पडले महागात!

2 जुलै 2017 रोजी कॅल्विन मास्करेन्हास, एक संगीतकार आणि इतर दोघांना सीमा शुल्क विभागने अटक केली होती. त्यांच्याकडून 30 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. एसआयटीने आतापर्यंत 12 गुन्हे दाखल केले आहेत, 30 लोकांना अटक केली आहे. टॉलीवूडशी संबंधित 11 लोकांसह एकूण 62 लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com