Ram Charan New Film: वी. सावरकरांच्या जयंतीनिमित्त The India House चित्रपटाची घोषणा, राम चरणने शेअर केला सिनेमाचा फर्स्ट लूक

The India House Film Announcement Video: RRR स्टार राम चरणने स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अर्थात ‘द इंडिया हाऊस’ या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
Ram Charan New Film Announcement On Social Media
Ram Charan New Film Announcement On Social MediaSaam Tv

Ram Charan New Film Announcement On Social Media: RRR स्टार राम चरणने रविवारी अर्थात आज स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘द इंडिया हाऊस’ या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते निखिल सिद्धार्थ आणि अनुपम खेर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या टायटल अनाऊंसमेंटचा व्हिडीओही आज सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Ram Charan New Film Announcement On Social Media
IIFA Award 2023: आयफामध्ये बोललीवूडला मराठी चित्रपटानं लावलं ‘वेड’, ठरला बेस्ट रिजनल सिनेमा...

साऊथ सुपरस्टारने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही व्हिडिओ क्लिप शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “आमचे महान स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त, आम्ही आमचा पुढचा चित्रपट द इंडिया हाऊसची घोषणा करतो.” राम चरणची ‘व्ही मेगा पिक्चर्स’ आणि अभिषेक अग्रवालची ‘अभिषेक अग्रवाल आर्ट्स’ असलेली प्रॉडक्शन कंपनी एकत्रित येत हा चित्रपट बनवत आहेत. लंडनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाभोवती चित्रपटाची कथा चित्रित करण्यात आली आहे. (Bollywood Film)

राम चरणची ‘व्ही मेगा पिक्चर्स’ आणि अभिषेक अग्रवालची ‘अभिषेक अग्रवाल आर्ट्स’ असलेली प्रॉडक्शन कंपनी एकत्रित येत हा चित्रपट बनवत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. चित्रपटाचे नाव ‘द इंडिया हाऊस’ असे आहे. लंडनमधील १९०५ ते १९१० या काळात भारतीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी विचारांना चालना देणारे विद्यार्थी गृह. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या निधीतून विनायक दामोदर सावरकर, भिकाजी कामा, व्ही.एन. चटर्जी, लाला हरदयाल आणि मदन लाल धिंग्रा हे त्याचे सदस्य होते. (Bollywood News)

Ram Charan New Film Announcement On Social Media
Madhurani Prabhulkar Share A Post: अरुंधतीने शेअर केला 'आई'चा रियल लाईफ स्ट्रगल; मुलीला वेळ देऊ शकत नसल्याने व्यक्त केली खंत

चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना खूपच आवडला असून सोशल मीडियावर सध्या चाहते प्रतिक्रिया देत आहेत. सध्या ट्विटरवर फक्त ‘द इंडिया हाऊस’ या चित्रपटाची तुफान चर्चा होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. काहींनी चित्रपटाला 'महाकाव्य' असे म्हटले तर काहींनी हा चित्रपट 'इतिहासाची बंद पाने उघडणार आहे'. (Bollywood Actor)

Ram Charan New Film Announcement On Social Media
Raghav-Parineeti Destination Wedding: राघव- परिणीतीला लगीनघाई, कुटुंबीयांसोबत गाठलं राजस्थान...

अनुपम खेर यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा करत एक खास पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, 'आज माझ्या पुढच्या आणि अतिशय महत्त्वाच्या #TheIndiaHouse' या चित्रपटाची घोषणा झाली. चित्रपटाचा भाग बनवल्याबद्दल त्याने राम चरणचे आभार मानत, निखिलसोबत पुन्हा काम करायला आवडेल असे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com