Ram Charan Share Photo: 'लेकीसोबतचा पहिला सण...' राम चरणने शेअर केले गणेश चतुर्थीचे खास फोटो

Ram Charan With Family: लेकीसोबत राम चरण पहिला सण साजरा करत आहे.
Ram Charan With Daughter Klin Kaara And Family
Ram Charan With Daughter Klin Kaara And Family Instagram @alwaysramcharan

Ram Charan Celebrated Daughter Klin Kaara First Festival:

देशभरात भक्तिमय वातावरण आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. कलाकार देखील बाप्पाला घरी आणण्यासाठी आतुर आहेत. या सगळ्यात राम चरणच्या पोस्टने मात्र नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.

याचं कारण आहे त्याची मुलगी क्लिन कारा. यावर्षी राम चरण आणि उपासना यांच्या घरी २० जूनला क्लिन काराचा जन्म झाला. तेव्हासासूनच राम चरण मुलगी चर्चेत आहे. क्लिन काराचे अपडेट कधी तिचे आजोबा तर कधी तिचे मम्मी - पप्पा शेअर करत असतात.

Ram Charan With Daughter Klin Kaara And Family
Marathi Movie Poster: प्रसाद खांडेकर यांची खुशखुशीत मेजवानी; 'एकदा येऊन तर बघा'चं मोशन पोस्टर प्रदर्शित

नुकतीच राम चरण एक पोस्ट शेअर केली आहे. लेकीसोबत राम चरण पहिला सण साजरा करत आहे. राम चरणच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. तर उपासना आणि राम चरण यांनी मुलीसह गणपतीची पूजा देखील केली आहे.

राम चरणने हे फोटो पोस्ट करत लिहिले आहे, 'सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! या वर्षी माझी लेक 'क्लिन कारा'सोबत पहिला सण साजरा करत आहे. राम चरणने ही पोस्ट त्याचे वडील आणि सुपस्टार चिरंजीवी यांना टॅग केली आहे. राम चरणच्या या पोस्टवर त्याच्या भाऊ पवन कल्याणने कमेंट करत लिहिले आहे, 'पप्पा (चिरंजीवी) तुमचे सगळं लक्ष क्लिन कारावर आहे.' (Celebrity)

राम चरण आणि चिरंजीवी यांच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने गणपतीची पूजा केली आहे. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित आहे. याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. भारतीय संस्कृती जपणाऱ्या या कुटुंबाचे नेटकरी करत आहेत. (Latest Entertainment News)

राम चरण त्याचा चित्रपट 'आरआरआर' प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला आहे. या चित्रपटामुळे दाक्षिणात्य चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. याच दरम्यान त्याची पत्नी उपासना गरोदर होती.

मुलीसाठी राम चरण - उपासना आणि चिरंजीवी शक्य ते सगळं करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. लेकीसाठी राम चरण आणि उपासना यांनी जंगल थीम असलेली खोली देखील तयार केली. जेणेकरून तिला निसर्गाचा सहवासात राहता उरतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com