Ramayana Serial: 'रामायण'चं शुटिंग कुठं झालं?, किती होतं मालिकेचं बजेट?; तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची ही आहेत उत्तर...

Ramayana Serial Shooting Location: या मालिकेला ३६ वर्षे पूर्ण झाली पण आजही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Ramayana Serial
Ramayana SerialSaam Tv

Ramayan Serial Budget:

दूरदर्शनवर प्रसारित झालेली रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची पौराणिक मालिका 'रामायण'(Ramayan Serial) आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. त्याकाळामध्ये या मालिकेला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेला ३६ वर्षे पूर्ण झाली पण आजही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कोरोना काळामध्ये या मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील या मालिकेचा टीआरपी जबरदस्त होता.

या मालिकेतील प्रत्येक पात्र सर्वांच्या लक्षात आहे. पण त्या काळामध्ये ही मालिका कशी तयार करण्यात आली, त्याचं शुटिंग कुठं करण्यात आलं होतं?, मालिकेचे बजेट किती होतं? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. त्यांच्या याच प्रश्नांची उत्तरं आज आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Ramayana Serial
Super Human Weapon Teaser: 'बाहुबली' तल्या कट्टपानं सुरु केलं नवं युद्ध, 'सुपर ह्यूमन वेपन'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

इतकं होतं मालिकेचं बजेट -

रामायण या मालिकेचा पहिला भाग २५ जानेवारी १९८७ साली दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आला होता. त्याकाळी या मालिकेच्या एका एपिसोडचे बजेट तब्बल ९ लाख रुपये होते. म्हणजेच ७८ एपिसोडच्या या मालिकेचे संपूर्ण बजेच हे ७ कोटींच्या आसपास होते. म्हणजेच ७ कोटी रुपये खर्च करून प्रेक्षकांसाठी ही मालिका तयार करण्यात आली होती.

Ramayana Serial
Nargis Fakhri On Teachers Day: खरा शिक्षक कोण?, ' अभिनेत्री नर्गिस फाखरीने सांगितला नेमका अर्थ

मालिकेने केली इतक्या कोटींची कमाई -

महत्वाचे सांगायचे झाले तर, या मालिकेने एका एपिसोडमधून त्याकाळामध्ये ४० लाख रुपयांची कमाई केली होती. म्हणजे अंदाजे या संपूर्ण मालिकेला ३१ कोटी ४ लाखांचा नफा झाला होता. ही त्याकाळातली मालिकेच्या माध्यमातून केलेली विक्रमी कमाई होती. या मालिकेचे शुटींग कुठे झआले होते हे जाणून घेण्यामध्ये अनेकांना खूपच रस आहे. या मालिकेचा सेट गुजरातमधील जनगणना असलेल्या उंबरगावमध्ये तयार करण्यात आला होता. तर मालिकेतील काही सीन वेगवेगळ्या ठिकाणी शूट करण्यात आले होते.

Ramayana Serial
Urmila Nimbalkar Interview: 'मालिकेतून काढून टाकलं..., मी डिप्रेशनमध्ये गेली', उर्मिला निंबाळकरने सांगितला वाईट काळातला अनुभव

५५० दिवस चालले मालिकेचे शुटिंग -

रामायणाच्या पहिल्या एपिसोडचे शूटिंग जवळपास १५ दिवस चालले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी या मालिकेचे सर्व क्रू मेंबर्स हे शूटिंगच्या लोकेशनवरच राहतो होते. या संपूर्ण मालिकेचे शूटिंग ५५० दिवस चालले होते. ही पहिली अशी मालिका होती की ज्यामध्ये स्पेशल इफेक्ट्स वापरण्यात आले होते. पुष्पक विमान असो वा हनुमानाच्या उडण्याचा देखावा असो या सर्वांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. प्रेक्षकांनाही हे सीन्स खूप आवडले.

Ramayana Serial
Shah Rukh Khan At Tirupati: 'जवान'च्या यशासाठी 'किंग खान' पोहचला तिरुपतीला, मुलगी सुहानासोबत घेतलं व्यंकटेश स्वामींचं दर्शन; VIDEO आला समोर

रामसेतूचा सीन खरा? -

या मालिकेचे बहुतांश शुटिंग हे सेटवर झाले असले तरी देखील राम सेतू सीनचे शुटिंग हे खऱ्या लोकेशवर झाले आहे. रामानंद सागर यांनी चेन्नईमध्ये हा सीन शूट केला होता. दरम्यान, या मालिकेसंदर्भातील अनेक मनोरंजक किस्से आपण आतापर्यंत ऐकले आहेत. मालिकेमध्ये काम केलेल्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे. सध्या ही मालिका तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com