Ramesh Deo : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन!

ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
Ramesh Dev
Ramesh DevSaamTvNews

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ ला कोल्हापुर मध्ये झाला होता. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये रमेश देव यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा अमिट असा ठसा उमटवला आहे.

रमेश देव (Ramesh Deo) यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी सह हिंदी चित्रपट सृष्टीतील (Bollywood) कलाकारांनी शोक व्यक्त केला असून एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेता आपल्यातून निघून गेल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे. मराठी चित्रपटसृष्टी व हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनेते रमेश देव यांनी विविध भूमिका साकारल्या. कधी नायक तर कधी खलनायक म्हणून रमेश देव प्रेक्षकांसमोर आले. मात्र, दोन्ही प्रकारच्या भूमिकांना त्यांनी न्याय दिला.

रमेश देव यांनी चित्रपट, रंगभूमी आणि दूरदर्शन अशा तीनही माध्यमातून प्रदीर्घ काळ मराठी चित्रपट सृष्टीत विविध भूमिका साकारल्या. रमेश देव यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण एक पाहुणा कलाकार म्हणून केले. निर्माते आणि दिग्दर्शक दिनकर पाटील यांच्या ‘रामराम पाव्हणं’ या १९५० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात रमेश देव यांना छोटीशी भूमिका साकारली होती. टायटलमध्ये त्यांचे नावही आले होते. पण गंमत म्हणजे, त्यानंतर सिनेमाची लांबी वाढतेय म्हणून त्यांची भूमिका कापण्यात आली होती.

त्यानंतर दिनकर पाटील यांच्याच ‘पाटलाचा पोर’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली. आणि इथूनच चंदेरी दुनियेतल्या त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी संख्या चित्रपट काम केले. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'आरती' हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com